शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोडली भाजीपाला शेतात गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:35 IST

शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. परिणामी यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहेत.

ठळक मुद्देकवडीमोल भाव, वाहतूक खर्चही निघत नाही

सदानंद लाहेवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. बाजारापर्यंत भाजीपाला नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. परिणामी यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहेत. शासनाच्या उदासीन धारेणामुळे शेतकरी देशोधडीस लागला असताना आता बागायती शेतकरीही त्याच वाटेवर आहे.महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायती शेतकरी केली जाते. खरीप हंगामात काहीही उरले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लावला आहे. टोमॅटो, वांगे, फुलकोबी, पानकोबी, काकडी, पालक, सांभार, वाल आदी पालेभाज्याला लावल्या आहे. परंतु या भाज्यांना सध्या बाजारात भावच नाही. कोबीच्या एका कट्ट्याला २५ ते ३० रुपयेच मिळत आहे. पालकाला तर कुणी हातही लावत नाही. टोमॅटो चिल्लर बाजारात दहा रुपयाला दीड किलो मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल कुणी घेत नाही. दूरच्या बाजारपेठेत भाजीपाला पाठवावा तर वाहतूक खर्चही निघत नाही. लावलागवड, बियाणे, फवारणी यासह तोडणीची मजुरी असा प्रचंड खर्च शेतकऱ्यांला करावा लागत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आता गुरे सोडली आहे. जनावरांना चारा तरी होईल, अशी आशा आहे.

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडाअनेक शेतकऱ्यांचे कुटुंब केवळ भाजीपाल्यावर चालविले जाते. नगदी पैसे हातात येत असल्याने कोणतीही अडचण जात नाही. परंतु यावर्षी भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे. त्यामुळे घर खर्च चालवावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. भाजीपाल्यातून समृद्धीच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे.

टॅग्स :agricultureशेती