शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

‘वसंत’पुढे शेतकरी, कामगारांचे आंदोलन

By admin | Updated: November 7, 2015 02:43 IST

वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम असताना आता ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांनीही वसंत समोर आंदोलन सुरू केले आहे.

थकीत रकमेची मागणी : १३ महिन्यांपासून वेतन नसल्याने उपासमारी उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम असताना आता ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांनीही वसंत समोर आंदोलन सुरू केले आहे. गतवर्षी वसंत साखर कारखान्यात मार्च ते जून या कालावधित १२ हजार मेट्रिक टन गाळप झाला. या ऊसाची एफआरपीनुसार थकीत बाकी तत्काळ मिळावी या मागणीसाठी वसंतचे माजी संचालक चितांगराव कदम यांनी गुरूवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. कारखाना संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे कारखाना बंद पडण्याच्या वाटेवर आहे. कामगारांचे १३ महिन्यांपासून वेतन थकित आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचेही पैसे थकीत आहे. ४७२ शेतकऱ्यांचे शिल्लक प्रती टन ६०० रुपये प्रमाणे व्याजासह पैसे द्यावे अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. त्यावेळी १५ दिवसात प्रश्न मार्गी लावू असे सांगितले होते. मात्र अद्यापही मागण्यापूर्ण झाल्या नसल्याने चितांगराव कदम यांनी उपोषण सुरू केले आहे. तर कामगारांनी १३ महिन्याच्या थकीत वेतनासाठी साखळी उपोषण कारखान्यापुढे सुरू केले आहे. गत १३ महिन्यांपासून कामगारांची उपासमार होत असून, कारखाना प्रशासन केवळ आश्वासने देतात. वारंवार आंदोलने करूनही उपयोग झाला नाही. शेवटी शुक्रवारी सकाळी १० वाजता कारखाना प्रवेशव्दारासमोर कामगार संघटनेचे अध्यक्ष पी.के. मुडे यांच्या नेतृत्वात शेकडो कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले. कारखाना प्रशासनाकडे पाच कोटी ३० लाख रुपये, वाढीव फरक दोन कोटी रुपये, ग्रॅज्युईटीची रक्कम ७५ लाख रुपये देणे आहे. ती सर्व रक्कम तत्काळ द्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. (शहर प्रतिनिधी)