शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला पिकांसाठी शेतकरी प्रशिक्षण वर्ग

By admin | Updated: August 1, 2016 00:52 IST

बळीराजा चेतना अभियानांंतर्गत स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे भाजीपाला पिकावरील किड...

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे आयोजन : भाजीपाला पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन मारेगाव : बळीराजा चेतना अभियानांंतर्गत स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे भाजीपाला पिकावरील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गुरूवारी दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. तालुक्यात भाजीपाला पिकांवर विविध किड व रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत असून किड नियंत्रणासाठी बेसुमार किटक नाशकांचा वापर करण्यात येतो. परिणामी उत्पादन खर्चात वाढत होऊन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. ग्राहकांनासुद्धा विषयुक्त भाजीपाला मिळत असल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे बळीराजा चेतना अभियान अंतर्गत भाजीपाला पिकावरील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पांढरकवडाचे उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते व वणीचे तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाला भाजीपाला पिक लागवडीचे तंत्रज्ञान यावर प्रा.शेंबेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांमध्ये असलेल्या विविध शंकांचे त्यांनी निरासरण केले. त्यानंतर प्रा.शरणागत यांनी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, पीक संरक्षणाविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अधिकारी एस.जी.नाईक यांनी प्रभावी किड नियंत्रणासाठी यांत्रीक किड नियंत्रण तंत्रज्ञानाची माहिती दिली. प्रगतीशील शेतकरी अरविंद बेंडे यांनी नियमित शेतीतून भाजीपाला लागवडीबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आयोजित प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाचे संचालन मारेगाव तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी केले. समारोपीच कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषी अधिकारी पुरूषोत्तम ठाकरे यांनी केले. प्रशिक्षण वर्गाला तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन व यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसन्न पारसकर, प्रमोद यवतकर व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने घेतलेल्या या प्रशिक्षण वर्गाबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)