शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी मंत्रालयात नोकरीचे आमिष देऊन शेतकरी पुत्राची फसवणूक

By admin | Updated: September 11, 2015 02:53 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयात नोकरीचे प्रलोभन दाखवून एका तरुणाला २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार.....

खैरगावचा तरुण : दागिने विकून भरले २० हजार हमीदखान पठाण अकोलाबाजारकेंद्रीय कृषी मंत्रालयात नोकरीचे प्रलोभन दाखवून एका तरुणाला २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार यवतमाळ तालुक्यातील खैरगाव येथे उघडकीस आला. तरुणाने आईचे दागिने विकून सदर पैसे भरले. सोमेश्वर मोहन पवार असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. तो नागपूर येथे एका खासगी बँकेत नोकरी करतो. एका वृत्तपत्रातील जाहीरातीवरून त्याने आॅनलाईन मुलाखत दिली. त्यांनतर त्याला किसान सेवा केंद्र, किसान भवन, ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) असे एक पत्र प्राप्त झाले. त्यात मुलाखतीमध्ये यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून नियुक्त झाल्याचे सांगण्यात आले. १८ हजार ५०० रुपये वेतन देणार असल्याचे पत्रात नमूद आहे. मात्र यासाठी त्याला किसान सेवा केंद्राच्या खात्यात १४ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. नोकरी मिळत असल्याने सोमेश्वर ने १० जुलै रोजी ती रक्कम बँक आॅफ अमेरिकामध्ये जमा केली. बँकेत भरलेल्या रकमेच्या पावत्यांची झेरॉक्स केंद्र प्रतिनिधीला दाखवून मोबाईल फोन व लॅपटॉप हस्तगत करण्याचे सूचविण्यात आले. त्यानंतर काही दिवसात पुन्हा एकदा पाच हजार रुपये खात्यात भरण्याकरिता मोबाईलवर संदेश आला. सोमेश्वरने पाच हजार रुपये भरले. एकूण १९ हजार ५०० रुपये भरले. नोकरीच्या आशेने त्याने दागिने विकून ही रक्कम भरली होती. दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही नोकरी मिळाली नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.