शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

जिल्ह्यात बियाणे आणि खतांची मुबलकता आहे. काही बियाणे उपलब्ध व्हायचे आहेत तर काही बियाणे पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. याशिवाय पेरणीचे नियोजन करण्यासाठी लागणारा पैसा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. प्रत्येक बँकेमध्ये ही गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नेटवर्कचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देकृषी विभागाचा इशारा : जोरदार पावसामुळे बियाणे दडपण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भात मान्सूनचे आगमन झाले आहे. प्रारंभीचा टप्पा मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटांसह आहे. अशा परिस्थितीत पेरणी केल्यास अतिपावसामुळे पेरण्या वाहून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे तूर्त १७ जूनपर्यंत पेरण्या थांबवाव्यात, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ जूनपर्यंत जोरदार पाऊस आणि वादळवारा राहणार आहे. यासोबतच विजाही पडतील असा अंदाज आहे. काही भागांमध्ये पाऊस जास्त सांगण्यात आला आहे तर काही भागांमध्ये कमी पाऊस आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पहिल्याच पावसात सर्वत्र दाणादाण पाहायला मिळत आहे. त्यामुळे पेरणीची घाई न करता शंभर मि.मी. पाऊस झाल्यानंतर योग्य ओलाव्यासह पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यामध्ये सध्या २४ हजार ४४० हेक्टरवर खरिपातील पेरण्या आटोपल्या आहे. त्यामध्ये ५५३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे तर १९ हजार ९०० हेक्टरवर कापसाची टोबणी झाली आहे. तीन हजार ९८७ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. एकूणच पेरणीच्या कामाला वेग आला आहे. यासोबतच पावसाचाही प्रचंड वेग आहे. त्यामुळे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. शेतात पुरेशी ओल तयार झाल्यानंतर पेरणी केली तर त्याचा धोका होत नाही, पेरलेले बियाणे निघून येते. अतिपावसामध्ये या पेरण्या झाल्या तर त्या दडपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता पाळीत तूर्त पेरण्या लांबाव्या, असा इशारा कृषी विभागाने हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिला आहे.जिल्ह्यात बियाणे आणि खतांची मुबलकता आहे. काही बियाणे उपलब्ध व्हायचे आहेत तर काही बियाणे पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. याशिवाय पेरणीचे नियोजन करण्यासाठी लागणारा पैसा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये गर्दी केली आहे. प्रत्येक बँकेमध्ये ही गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नेटवर्कचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे- जिल्ह्यामध्ये साडेचार लाख हेक्टरवर कापसाची लागवड होणार  आहे. त्यापैकी १९ हजार ९०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड कळंब तालुक्यात झाली आहे. यावरून कापसाचे लागवड क्षेत्र यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ जूनपर्यंत विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज प्रत्येक ठिकाणी खरा ठरेल असे नाही. मात्र, शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेता १७ जूनपर्यंत पेरणी करणे टाळावे. त्यानंतर पेरणी करावी. या काळात तासी ३० ते ४० किलाेमीटर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

शेतकऱ्यांनी पुढील परतीच्या पावसाचा अंदाज घेत प्रथम कापसाची लागवड करावी, त्यानंतर सोयाबीनची लागवड करावी. लागवड करताना सोयाबीनच्या पेरणीसाठी घाई करू नये. प्रक्रिया करूनच बियाणे वापरावे.- डॉ. प्रमोद यादगीरवारसहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती