यवतमाळ : दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर फटका बसला. उत्पन्न चांगले नसल्याने त्यांची स्थिती पीक कर्ज भरण्यासारखी नाही. त्यामुळे शासनाने पीक कर्जाचे रुपांतरण केले आहे. गेल्या हंगामातील कर्जाचा एक पैसाही न भरलेल्या शेतकऱ्यांना रुपांतरण योजनेअंतर्गत पीक कर्ज मिळणार आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंग यांनी केले आहे. गेल्या खरीप हंगामात पाऊस समाधानकारक झाला नाही. जिल्ह्यावर दुष्काळी स्थिती ओढवली होती. अनेक शेतकऱ्यांना या दुष्काळाचा फटका बसला. उत्पन्न समाधानकारक न झाल्याने घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीमुळे शासनाने गेल्या वर्षातील २०१४-०१५ मधील पिककर्जाचे रुपांतरण केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे पाच हप्ते पाडुन दिले जाणार आहे. पुढील पाच वर्षात हे हप्ते भरता येईल. या रुपांतरीत हप्त्यातील पहीला हप्ता या वर्षी भरायची गरज नाही. यावर्षी नव्याने घेतलेले कर्ज भरतांना पुढील वर्षी पहीला हप्ता भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानंतरचे चार हप्ते पुढे भरता येईल. पीक कर्जाबाबत नुकतीच सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकांची बैठक घेवून खरीप पीक कर्जाचा आढावा घेतला. (कार्यालय प्रतिनिधी)
पीक कजार्साठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे
By admin | Updated: May 27, 2015 02:11 IST