शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी घुगऱ्या घेऊन रस्त्यावर

By admin | Updated: April 25, 2017 01:04 IST

नाफेडने तूर खरेदी कायम बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी घुगरी आंदोलन केले.

नाफेडची तूर खरेदी : वीज वितरणसमोर पोलीस आणि शेतकऱ्यात झटापट, घुगऱ्यांचे मडके फुटले यवतमाळ : नाफेडने तूर खरेदी कायम बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी घुगरी आंदोलन केले. शिजविलेल्या तुरीचे मडके घेऊन जनता दरबारात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी आणि पोलिसांमध्ये वीज वितरण कंपनीसमोर चांगलीच झटापट झाली. यात आंदोलकांनी आणलेले घुगऱ्याचे मडके फुटल्याने शेतकऱ्यांच्याही संयमाचा बांध फुटला. तर तूर खरेदीसंदर्भात प्रशासनासोबत झालेल्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही.जिल्ह्यातील बाजार समितीतील नाफेडची तूर खरेदी शनिवार २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. आजही बाजार समितीत शेकडो क्ंिवटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु खरेदी होत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने रविवारी घुगरी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शिजविलेल्या तुरीच्या घुगऱ्या घेऊन शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी पालकमंत्र्यांकडे निघाले. पालकमंत्री मदन येरावार हे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तिकडे मोर्चा वळविला. परंतु पोलिसांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांना अडविले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. दरम्यान झटापट सुरू झाली. यातच शेतकऱ्यांनी आणलेले घुगऱ्याचे मडके फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला. आंदोलक आणि पोलिसात धक्काबुक्कीही झाली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांचा निरोप पालकमंत्री मदन येरावार यांना दिला. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जनता दरबारात पोहोचले. या ठिकाणी नाफेडने तूर खरेदी करावी अशी मागणी लावून धरली. यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काय निर्णय होतो याची माहिती देण्यात येईल, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी सकाळी बाजार समितीमध्ये उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख, प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे बजरंग ठाकरे, तहसीलदार सचिन शेजाळ आणि शेतकरी प्रतिनिधी यांची चर्चा झाली. या बैठकीत नाफेडने तूर खरेदी सुरु करावी, अशी विनंती करण्यात आली. तसे पत्र जिल्हा प्रशासनाच्यावतीने नाफेडच्या प्रतिनिधीला दिले. मात्र नाफेडने तूर खरेदी करण्यास स्पष्ट नकार दिला. पुढील आदेशानंतरच तूर खरेदी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले होते. आजच्या आंदोलनात कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, यवतमाळचे रवींद्र ढोक, आर्णीचे राजेंद्र पाटील, बाभूळगावचे नरेंद्र कोंबे, नेरचे रवींद्र राऊत, पांढरकवडाचे प्रकाश मानकर, खविसंचे अध्यक्ष बाळूपाटील दरणे, निखील जैत, महिला संचालक छाया शिर्के यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर) जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामा करण्याचे आदेशनाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर असलेल्या तुरीचे पंचनामे करण्याची मागणी करीत आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. यावेळी तेथे खासदार भावना गवळी यांच्यासह १६ ही बाजार समितीचे सभापती आणि खरेदी विक्रीसंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याची मागणी मान्य करीत संबंधित तहसीलदार व उपनिबंधकांना या संदर्भात सूचना दिल्या.