शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध

By admin | Updated: March 30, 2015 02:07 IST

तालुक्यातील लोहरा ईजारा आणि बुटी येथे प्रस्तावित पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून पवनचक्कीसाठी बेकायदेशीर जमीन हस्तगत केल्याचा आरोप होत आहे.

प्रकाश लामणे पुसदतालुक्यातील लोहरा ईजारा आणि बुटी येथे प्रस्तावित पवनचक्की प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून पवनचक्कीसाठी बेकायदेशीर जमीन हस्तगत केल्याचा आरोप होत आहे. याबाबत नागरिकांनी फेरफारवर स्थगनादेशासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले आहे. देशात बड्या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेऊन प्रकल्प उभारत आहे. बड्या कंपन्यांचे मालक आणि दलाल यांच्या संगनमतातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यात येत आहे. याचाच प्रत्यय पुसद तालुक्यातील लोहरा-ईजारा व बुटी येथील शेतकऱ्यांना येत आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील लोहरा येथील शेतकरी सोमला वसराम राठोड यांनी पुसदच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले. तालुक्यातील लोहरा व बुटी परिसरात नियोजित पवनचक्की प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करताना भुलथापा देत नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात गैरअर्जदार म्हणून शेंबाळपिंपरी येथील मंडळ अधिकारी, लोहरा येथील तलाठी, पुसद येथील राजेश कोटलवार व इतर नऊ जणांचा समावेश आहे. या सर्वांनी संगनमत करून पवनचक्की प्रकल्पासाठी जमीन हस्तगत करताना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम २४७ नुसार रितसर करण्यात आले नाही. शेत सर्वेनंबर १५४ मधील सोमला राठोड यांची जमीन एक हेक्टर ४४ आरचा करण्यात आलेला फेरफार बेकायदेशीर आहे. यावर स्थगनादेश मिळावा म्हणून सोमला राठोड यांनी अपिल दाखल केले आहे. याचा निकाल लागेपर्यंत पवनचक्कीसाठी बांधकाम करण्यात येऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे. पुसद तालुक्यातील लोहारा, इजारा, बुटी, सावरगाव आदी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहे. वारस बाहेरगावी असताना शेतजमिनीबाबत संशयास्पदरीत्या व्यवहार झाल्याची चर्चा आहे. पवनचक्की प्रकल्पाच्या मोजणीच्यावेळी या प्रकल्पातील शेतकरी व शेतमालक हजर नसल्याचीही माहिती आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून या प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे. (प्रतिनिधी)