शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:27 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन किसान सभा आक्रमक झाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देकिसान सभा आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयात दिला ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन किसान सभा आक्रमक झाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, ही मागणीही आंदोलकांनी यावेळी रेटून धरली. शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीची मदत आणि दीड लाख रुपयांची कर्जमाफी अजूनही मिळाली नाही. त्यातच यावर्षीच्या दुष्काळाने भर घातली. जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळाने होरपळून निघालेले आहेत. असे असताना शासनाने केवळ नऊ तालुक्यात दुष्काळ घोषित केला.कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आहे. या पिकाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, कपाशीच्या विम्याची पूर्ण रक्कम न देणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करावा, शेतीला २४ तास वीज मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे. दरम्यान आंदोलनाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी भेट दिली. आंदोलनात तुकाराम भस्मे, अनिल हेपट, अनिल घाटे, गुलाबराव उमरतकर, हिम्मतराव पाटमासे, राकेश अजनकर, दिलीप लांजेवार, वासुदेव गोहणे आदी सहभागी झाले आहेत.