शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

खरिपात शेतकऱ्यांचे हाल

By admin | Updated: June 19, 2016 02:24 IST

नैसर्गिक आपत्ती व दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऐन खरीप हंगामात तगमग सुरू आहे. बी-बियाणे घेण्याकरिताही त्यांच्याकडे पैसा नाही.

बियाणांची सोय नाही : दुष्काळी स्थितीमुळे चारा डेपोची गरजपुसद : नैसर्गिक आपत्ती व दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऐन खरीप हंगामात तगमग सुरू आहे. बी-बियाणे घेण्याकरिताही त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे पीककर्जाचे तातडीने पुनर्गठन करून चारा डेपो सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. शासनाकडून यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला. परंतु अद्यापपर्यंत सन २०१० ते १३-१४ पर्यंतच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी गांजला आहे. तो आर्थिक हलाखीचा सामना करीत आहे. त्यामुळे शासनाने केवळ एक-दोन वर्षाचे नव्हे तर मागील पाच वर्षातील पीककर्जाचे पुनर्गठन करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाने चारा डेपो सुरू करण्याची गरज होती. परंतु त्या दृष्टीने हालचाली झालेल्या नाही. जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने दुभत्या जनावरांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहे. एकीकडे खरीप हंगामात लागवड कशी करावी, या चिंतेत शेतकरी असताना पीक विम्याची रक्कम कर्जात कपात केली जात आहे. प्रशासनाकडून या प्रकारे शेतकऱ्यांवर दुहेरी वार केला जात आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी मिळालेली पीक विम्याची २७ कोटींची रक्कम कर्जात कपात न करता तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज आहे. या मागण्यापूर्ण झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. (प्रतिनिधी)दोन संघटनांनी उठविला आवाजकर्जाचे पुनर्गठन करावे, चारा डेपो सुरू करावा, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी या मागणीसाठी दोन संघटनांनी आवाज उठविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण पुलाते, विश्वजीत लांडगे, भारत वानखेडे, कपिल आबाळे, रवी तायडे, महादेव तोडकर, दिनेश ठाकूर, सुभाष कांगळे, अवधूत मस्के, राजाभाऊ डहाके, अवधूत शेळके, संजय बोटवारे आदींनी या संदर्भात तहसीलदार डॉ.संजय गरकल यांना शनिवारी निवेदन दिले. तर परिवर्तन सामाजिक संघटनेचे बळवंत मनवर, रिपब्लिकन सेना प्रमुख संजय इंगोले, आनंद कांबळे, संतोष अंभोरे, बाबुराव वाघमारे, सुनील पवार, ओंकार राठोड, तुकाराम राठोड, विजय पवार, दिलीप घाटे, प्रभाकर खंदारे, शेषराव डाखोरे, रामजी पाईकराव, लक्ष्मी खंदारे, कमल कांबळे, प्रमोद राऊत, भगवान धुळे, सारंग आडसर, शुभम देवकुळे, भारत साठे, सुनील दवने, अविनाश आखरे आदींनी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना निवेदन दिले.