शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निंगनूर येथील शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:37 IST

मनरेगाअंतर्गत मंजूर झालेल्या विहीर बांधकामाचा मोबदला तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यामुळे निंगनूर येथील पाच शेतकºयांनी मंगळवारपासून तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र प्रशासनाने त्वरित मोबदला देण्याची ग्वाही दिल्याने बुधवारी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : मनरेगाअंतर्गत मंजूर झालेल्या विहीर बांधकामाचा मोबदला तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यामुळे निंगनूर येथील पाच शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र प्रशासनाने त्वरित मोबदला देण्याची ग्वाही दिल्याने बुधवारी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.आदिवासी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरणाºया तत्कालीन ग्रामसेवकासह संबंधितांवर कठोर कारवाई करून वरिष्ठांनी न्याय मिळवून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. २०१२-१३ मध्ये मनरेगाअंतर्गत पाच शेतकऱ्यांना विहीर बांधकामासाठी मंजुरी मिळाली. त्यामुळे निंगनूर येथील शेतकरी काळूराम टारपे, मारोती टारपे, दत्ता टारपे, उकंडा मुरमुरे व संभाजी घावस यांनी शेतात खोदकाम केले. मात्र अद्याप त्यांना मोबदला मिळाला नाही.बांधकामाचा मोबदला मिळण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक घावडे यांनी मस्टर आॅनलाईन करण्यास जाणीवपूर्वक कुचराई केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रत्यक्षात काम करूनही सदर ग्रामसेवकाने लालसेपोटी आम्हाला मोबदल्यापासून वंचित ठेवले आणि प्रत्यक्षात कामे न केलेल्या लाभार्थ्यांना मात्र ‘लक्ष्मी दर्शन’ करताच कामाचा मोबदला मिळवून दिला, असा त्यांचा आरोप आहे. आता चौकशीचे आश्वासन मिळाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.स्थायी समितीत प्रश्न उपस्थितउपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी संबधित शेतकऱ्यांच्या प्रलंबिंत समस्यांबाबत येतया स्थायी समिती सभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषद सदस्य चिंतागराव कदम, दतराव शिंदे, सहायक गटविकास अधिकारी खुडे, उत्तम पांडे, शेषराव गुडे यांच्यासह निंगनूरचे नागरिक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत उपोषणमागे घेण्यात आले.