शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

सरपंचाकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: September 21, 2014 23:57 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर करून देण्याचे आमिष देऊन चार शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या तालुक्यातील सुकळी येथील सरपंच व उपसरपंचाविरुद्ध आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उपसरपंचावरही गुन्हा : सुकळी येथील सिंचन विहीर मंजुरीचे प्रकरण आर्णी : रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर करून देण्याचे आमिष देऊन चार शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या तालुक्यातील सुकळी येथील सरपंच व उपसरपंचाविरुद्ध आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरपंच अनिता रोहिदास जाधव, उपसरपंच नारायण सवाई राठोड असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजुरीसाठी ३१ डिसेंबर २०११ रोजी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली गावात सभा घेण्यात आली. त्यावेळी हरीसिंग राठोड, ताराबाई कुऱ्हाडे, बहिणाबाई राठोड, सुभाष राठोड यांच्या नावे विहिरीसाठी ठराव घेण्यात आला. त्यानंतर सरपंच व उपसरपंचाने या चौघांकडून प्रत्येकी ५ हजार ३०० रुपये घेतले असा आरोप आहे. प्रत्यक्षात मात्र तेव्हापासून विहीरच झाली नाही. याबाबत सरपंच आणि उपसरपंचांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या शेतकऱ्यांनी आर्णी पोलीस ठाणे गाठले. हिरासिंग मेरसिंग जाधव रा.सुकळी यांनी फसवणूक झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्यावतीने रविवारी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सरपंच अनिता जाधव, उपसरपंच नारायण राठोड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी कुणालाही अटक केली नव्हती. मात्र या घटनेने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून असे अनेक प्रकार तालुक्यात पुढे येण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)