शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:41 IST

हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांना व्याजाने पैसे द्यायचे, हे पैसे देताना विना रकमेचे स्वाक्षरीचे धनादेश घ्यायचे, शेतातील माल हाती आला की, संबंधित शेतकऱ्यांना हेरून त्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे आपले धान्य विकण्यासाठी बाध्य करायचे.

ठळक मुद्देसोयाबीन उत्पादक हतबल : अवैध सावकारी करणाºया दलालांचा दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : हंगामाच्या सुरूवातीला शेतकऱ्यांना व्याजाने पैसे द्यायचे, हे पैसे देताना विना रकमेचे स्वाक्षरीचे धनादेश घ्यायचे, शेतातील माल हाती आला की, संबंधित शेतकऱ्यांना हेरून त्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे आपले धान्य विकण्यासाठी बाध्य करायचे. त्याद्वारे दलाली खायची, असा गोरखधंदाच काही दलालांकडून वणीत सुरू झाला आहे. यातून शेतकऱ्यांना हजारो रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ, अशा संकटांना सामोरे जात शेतकरी आपला शेतीचा व्यवसाय तारेवरची कसरत करत सांभाळत आहे. मागील काही वर्षात पीक उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. अनेकदा हंगामासाठी शेतकऱ्यांजवळ पैसेच नसतात. नेमका याच संधीचा फायदा घेऊन वणी शहरातील काही धान्याचे दलाल सावकारीच्या व्यवसायात उतरले आहे. गरजवंत शेतकऱ्यांना हेरायचे, त्यांना आवश्यक असलेली रक्कम व्याजाने द्यायची, त्याबदल्यात त्यांच्याकडून विना तारखेचा, पण स्वाक्षरी असलेला धनादेश घ्यायचा. शेतीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले की, पुन्हा त्यांना गाठायचे. शेतीतून आलेले धान्य ठराविक खासगी व्यापाऱ्यांकडेच विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाध्य करायचे.हंगामासाठी पैसे मिळाल्याने शेतकरीही अशावेळी हतबल होऊन दलाल सुचवेल, त्या व्यापाºयाकडे धान्याची विक्री करत असल्याचा प्रकार सध्या वणी शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. धान्य विकल्यानंतर शेतकरी संबंधित दलालाला व्याजासह पैसे परत करतो. सोबतच व्यापारीदेखिल या दलालाला त्याचे कमीशन अदा करतो. अशा दुहेरी फायद्यात सध्या दलालांचा धंदा सुरू आहे. विशेष म्हणजे या दलालांवर कुणाचेही नियंत्रण नाही. शेतकऱ्यांची गरज हेरून व्यापारीदेखिल आपल्या मनमर्जीने शेतकºयांच्या मालाला भाव देत आहे. शेतकरी दलालांच्या दबावाखाली येऊन धान्य खासगी व्यापाºयांना विकत असल्याचे चित्र वणी शहरात पाहावयास मिळत आहे.मध्यंतरी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पथकाने वणी शहरात अवैधरित्या धान्य खरेदी करणाºया तीन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठाणांवर धाडी टाकून कारवाई केली खरी; परंतु या कारवाईचा शहरात कोणताही परिणाम दिसून येत नाही. शहरात अनेक ठिकाणी अजूनही दलालांच्या माध्यमातून अनधिकृतपणे सोयाबीनची खरेदी सुरू आहे. एकीकडे बाजार समितीत तीन हजार रूपयांपेक्षा अधिक भाव सोयाबीनला मिळत असताना काही हतबल शेतकऱ्यांना दलालांच्या दबावात येऊन दोन हजार ५०० ते दोन हजार ८०० रूपये भावाने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. मिळालेल्या पैशातून सावकाररूपी दलालांच्या कर्जाचा व्याजासहित परतावा शेतकऱ्यांना करावा लागतो.शेतकऱ्यांचे रक्त शोषून दलालांची विदेशवारीगेल्या काही वर्षांपासून वणी शहरात काही दलाल अनधिकृतपणे सावकारी करीत आहे. व्याजबट्ट्याच्या धंद्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर नागवल्या जात आहे. हाडाची काडं अन् रक्ताच पाणी करून शेती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे रक्त शोषणाऱ्या या दलालांनी मध्यंतरी केलेली विदेशवारी सध्या चर्चेचा विषय आहे. या दलालांसोबत तालुक्यातील काही अवैध सावकारी करणारे कृषी केंद्र संचालकही विदेशवारीवर गेले असल्याची चर्चा आहे.