शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो लगेच पेरणी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.

ठळक मुद्देकृषितज्ज्ञांचा सल्ला : पावसाला पडणार खंड

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहे. हा पाऊस मान्सूनचा नसल्याने मध्ये मोठा खंड आहे. अशा स्थितीत झालेली टोबणी उलटण्याचा धोका आहे. यामुळे तूर्त शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवाव्या, असा सल्लापेरणी करण्यासाठी किमान १०० मिमी पावसाची गरज असते. १०० मिमी पाऊस बरसल्यानंतर केलेली पेरणी पावसाचा विलंब झाला तरी सुरक्षित अंकुरते. मात्र जिल्ह्यात जेमतेम १६ मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने ११ जूनपर्यंत पावसाचा खंड सांगितला आहे. या काळात उन तापणार आहे. यामुळे अंकुरलेले बियाणे अपुऱ्या पावसाने करपण्याचा अधिक धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये. १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.सध्या मान्सून केरळपर्यंतच मर्यादित आहे. राज्याकडे त्याने वाटचाल केली नाही. मान्सून मुंबईत आल्यानंतर विदर्भात येतो. सध्या ही प्रक्रिया रेंगाळली आहे. मुबलक पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील उष्णता बाहेर पडते. पुढील काळात अधिक पाऊस वर्तविण्यात आला आहे. यामुळे कापसाची लवकर लागवड केली तर कापसाला बोंडसडीचाही धोका आहे. मान्सूनपूर्व लागवडीने गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भीती आहे.सध्याचा पाऊस मान्सूनपूर्व आहे. चक्रीवादळाने त्यात भर घातली. हा पाऊस पेरणीचा समजून काहींनी पेरणीला सुरूवात केली. मुळात हा पाऊस मान्सूनचा नाही. त्याला १७ जूनपर्यंत विलंब आहे. तूर्त शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.- पंकज बर्डे, प्रभारी, कृषी विकास अधिकारी, यवतमाळमान्सूनपूर्व कपाशीची लागवड शेतकऱ्यांना संकटात टाकणारी ठरू शकते. पावसाचा खंड असल्याने पेरणी उलटू शकते. यामुळे तूर्त शेतकºयांनी पेरणी थांबवावी. जांभुळवाई करून १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.- डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संचालक (संशोधन) केव्हीके, यवतमाळ.वेधशाळेने ११ जूनपर्यंत पावसात खंड सांगितला आहे. शेतशिवारात १६ मिमी पावसाची नोंद आहे. अशा स्थितीत पेरणी करणे धोक्याचे आहे. १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती