शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

नेर येथे शेतकरी निर्धार परिषद

By admin | Updated: November 7, 2015 02:37 IST

शेतकऱ्यांच्या हुंदक्यांचे रुपांतरण हुंकारात करण्यासाठी नेर येथे शेतकरी निर्धार परिषदेचे आयोजन ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वागत मंगलकार्यालयात करण्यात आले आहे.

परिवसंवादाचे आयोजन : युवा शेतकरी संघर्ष समितीचे आयोजननेर : शेतकऱ्यांच्या हुंदक्यांचे रुपांतरण हुंकारात करण्यासाठी नेर येथे शेतकरी निर्धार परिषदेचे आयोजन ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वागत मंगलकार्यालयात करण्यात आले आहे. युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आयोजीत या परिषदेचे उद्घाटन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. एका दाण्याचे एक हजार दाणे करणारा शेतकरी मरणाच्या दुष्टचक्रात ढकलला जात आहे. सोयाबीनने दगा दिला. कुणीही यावे आणि शेतकऱ्याला लुटावे अशी स्थिती आहे. त्यातच वन्यप्राणी वीज वितरण कंपनी, प्रशासकीय यंत्रणा आणि शासन निगरगट्ट झाले आहे. अशा दयनीय अवस्थेतून शेतकऱ्यांना बाहेर कााढण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी वऱ्हाडी कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून नेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पवन जयस्वाल, सहकार नेते बाबू पाटील जैत, नेर अर्बनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गद्रे, पंचायत समिती सभापती भारत मसराम उपस्थित राहतील. यावेळी शेतकऱ्यांच्या मरणाची कोंडी कशी फुटणार या विषयावर परिसंवाद आयोजित आहे. अध्यक्षस्थानी शेती प्रश्नांचे अभ्यासक चंद्रकांत वानखडे राहतील. या परिसंवादात सामाजिक प्रश्नांचे तत्वचिंतक अमर हबीब, शेतकरी आंदोलक विजय जावंधिया, विजय विल्हेकर, गजानन अमदाबादकर मार्गदर्शन करणार आहे. समारोपीय कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता आयोजित असून, अध्यक्षस्थानी प्रहार युवाशक्ती संघटनेचे नेते तथा अचलपूरचे आमदार ओमप्रकाश-बच्चू कडू राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र माहुरे, भाजपा तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम लाहोटी, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन भोकरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप देशमुख, कृषिभूषण हिंमतराव देशमुख उपस्थित राहणार आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)