सोयाबीनसाठी शेतकऱ्यांचे जागरण : दरवर्षी कापूस विकून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात यंदा कापूस यायचाच आहे. त्यामुळे कसेबसे का होईना पण हाती आलेले सोयाबीन विकण्यासाठी शेतकरी घाई करीत आहेत. भाव पडलेले असतानाही बाजार समितीमध्ये आवक वाढत आहे. यवतमाळ बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रात्री ११ वाजेपर्यंत काटा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थंडीच्या दिवसात यार्डातच सोयाबीनच्या ढिगाजवळ मुक्काम करावा लागत आहे.
सोयाबीनसाठी शेतकऱ्यांचे जागरण :
By admin | Updated: October 26, 2016 00:30 IST