शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

ठळक मुद्देशिवाजी चौकात ठिय्या : कापूस खरेदीसाठी प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तीन दिवसांपासून कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेली वाहने रस्त्यात आडवी लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली.शनिवारपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलबंडी व विविध वाहनांद्वारे येथील बाजार समितीत आपला कापूस विक्रीस आणला आहे. मात्र शनिवारपासून एकाही वाहनातील कापसाचे मोजमाप झाले नाही. सोमवारी सकाळपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांना अपे होती. मात्र सकाळपासून खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला नाही. सायंकाळी ५ वाजतापर्यंत या वाहनांकडे कुणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अनेक शेतकऱ्यांनी आपली कापूस भरलेली विविध वाहने शिवाजी चौकात आणली. पुसद-आर्णी मार्गावरील या चौकात ही वाहने आडवी लावण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास पुसद-यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र घटनास्थळी बाजार समितीचे कोणतेही अधिकारी व संचालक पोहोचले नाही. अखेर तहसीलदार राजेश वझिरे यांनी घटनास्थळी भेट दिली.तहसीलदारांनी संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकºयांनी कापूस खरेदी होत नसल्याने दररोज वाहन भाड्यापोटी एक ते दीड हजार रुपये मोजावे लागत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. वझिरे यांनी मंगळवारपासून कापूस खरेदी करण्याची ग्वाही दिली. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. भाजपचे महादेवराव सुपारे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, मनोज जाधव, विष्णू राठोड, बापुराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांचा प्रस्ताव फेटाळून लावला. बाजार समितीने कापूस खरेदी बंद असल्याबाबत साधी नोटीसही दिली नसल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला.तहसीलदारांची मध्यस्थी यशस्वीसायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तहसीलदार वझिरे यांनी आंदोलक शेतकºयांची पुन्हा चर्चा केली. या चर्चेत सर्व ट्रॅक्टर आर्णी येथील बाजार समितीत पाठविण्याचा निर्णय झाला. आर्णी येथे सोमवारीच या ट्रॅक्टरमधील कापूस मोजणी करण्याची ग्वाही देण्यात आले. तसेच बैलबंडीतील कापूस मंगळवारी सकाळी खरेदी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी भेट दिली.