शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचा बळीराजा पुन्हा संकटात; ढगाळ वातावरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:44 IST

Yavatmal news, agriculture यवतमाळ जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात येते. तुरीचे पीक फुलोऱ्यावर असताना ढगाळ वातावरण आहे . यामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे .

यवतमाळ :  जिल्ह्यातील शेतकरी आंतरपीक म्हणून तूर आणि कापूस मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात येते. तुरीचे पीक फुलोऱ्यावर असताना ढगाळ वातावरण आहे . यामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे . खरीप हंगाम शेतकर्‍यांना रडविणारा ठरला आहे. आधी सोयाबीन गेले. कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. कपाशीचे बोंडही घरात आले नाही. उभ्या शेतातील पीक शेतकर्‍यांनी काढून टाकले. यातून सावरत नाही तोच आता ढगाळी वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

नोव्हेंबर महिन्यात वातावरणात बदल झाल्याने त्याचा परिणाम तुरीवर होत आहे. दमट वातावरणामुळे थंडी गायब झाली. हवामान बदलाचा तूर पिकांना फटका बसला आहे. दरम्यानच्या कालावधीत अवकाळी पावसानेही हजेरी लावली. ढगाळी वातावरणासह धुवारीने तुर पिकांचा फुलोराही गळून पडत आहे. तूर पिकाला लागलेल्या कोवळ्या तुरीच्या शेंगात अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळत आहे. सोयाबीन, कपाशीनंतर शेतकर्‍यांची अपेक्षा तुरीवर होती. परंतु अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांची निराशा झाली असल्याचची व्यथा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या बोथबोडन (ता. यवतमाळ) गावातील शेतकरी अनुप चव्हाण यांनी मांडली.

टॅग्स :agricultureशेती