शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या निष्क्रियतेने शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:24 IST

उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

ठळक मुद्देविखे पाटील : सावळेश्वर, राजूरवाडीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/घाटंजी : उमरखेड येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी शासनाने क्रौर्याची परिसीमा गाठली. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे आणि टिटवी येथील प्रकाश मानगावकर यांची आत्महत्याही बेदखल ठरविली. शासनाच्या निष्क्रयेतेमुळे शेतकरी आत्महत्या होत असून सरकार आणि प्रशासनाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर व घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी रविवारी या दोन्ही गावांना भेट दिली. सावळेश्वर हे गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतल्यामुळे सरकार रावतेंची आत्महत्या दडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्जमाफी आणि बोंडअळीची मदत न मिळाल्याने रावते यांनी आत्महत्या केली. मात्र सरकार पुरावे दडविण्याचा प्रयत्न करीत असून हा अपघात असल्याचा खटाटोप करीत आहे. विखे यांनी रावते कुटुंबाला एक लाख मदतीचा धनादेश दिला. यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर, तातू देशमुख, भागवत देवसरकर, दत्तराव शिंदे उपस्थित होते.समाजातील सर्व घटक सरकारला कंटाळलेघाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त चायरे कुटुंबाची राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. तेथे शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, वाढती गुन्हेगारी यासह प्रत्येकच क्षेत्रात विद्यमान सरकार सपशेल अपयशी ठरले असून समाजातील सर्वच घटक या सरकारला कंटाळल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून गेल्या चार वर्षात शेतमालाचे भाव अर्ध्यावर आले. कर्जमाफीचा लाभ तुरळक शेतकºयांना मिळाला. गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अद्याप शासनाने जाहीर केलेली भरपाई मिळाली नाही. शेतकरी थेट सरकार व पंतप्रधानांचे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीत आहेत. यावरूनच या सरकार विरोधात किती असंतोष आहे, ते स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी राजूरवाडी येथे मृत शेतकरी शंकर चायरे व प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. दोन्ही कुटुंबांना काँग्रेसतर्फे प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची ग्वाही दिली. शिवाय कुटुंबातील मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्विकारली. यावेळी माजी आमदार विजय खडसे, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, सैय्यद रफिक बाबू, संजय निकडे, शालिक चवरडोल, संजय डंभारे, गजानन पाथोडे, गोपाल उमरे, रोहितसिंग सिद्धू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते