पुसद : यावर्षी खरीप हंगामात समाधानकारक उत्पादन झाले असतानाच नोटाबंदी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक गणित बिघडले आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी तुरीला गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्धाही भाव नसल्याने तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन आणि कापसाने नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढविले. परंतु याच वेळी बाजारात तुरीचे भावही कोसळले आहे. गेल्या वर्षी नऊ ते १० हजाराच्या घरात गेलेला भाव यवर्षी केवळ साडेचार हजार रुपयांवर आला आहे. मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने यावर्षी देखील तुरीला चांगला भाव राहिल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. अशा वेळी अनेकांनी आपले इतर पिकांचे क्षेत्र कमी करून तूर पिकांची लागवड केली. आता तुरीचे भावच कोसळल्याने शेतकऱ्यांना काय करावे कळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, यामध्ये शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
तुरीला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त
By admin | Updated: January 12, 2017 00:54 IST