लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : थकीत बिलापोटी वीज वितरण कंपनीने कृषिपंपांचा पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. ऐन हंगामात होत असलेल्या कारवाईने शेतकरी हतबल झाले असून शुक्रवारी तालुक्यातील शेकडो शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले.नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीने तालुक्यातील शेतकºयांना कृषिपंपांचे बिल भरणे शक्य झाले नाही. या बिलापोटी वीज वितरणने पुरवठा खंडित करण्याचा सपाट लावला. परंतु थकबाकीदारांना शासनाने १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. असे असतानाही वीज वितरणचे अधिकारी पुरवठा खंडित करीत आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. याबाबत जाब विचारण्यास तालुक्यातील शेतकरी शुक्रवारी वीज वितरण कार्यालयावर धडकले. त्यांनी उपकार्यकारी अभियंता गणेश चव्हाण यांना निवेदन देवून प्रश्नांचा भडीमार केला.
दिग्रसमध्ये शेतकरी महावितरणवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:55 IST
थकीत बिलापोटी वीज वितरण कंपनीने कृषिपंपांचा पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. ऐन हंगामात होत असलेल्या कारवाईने शेतकरी हतबल झाले असून.....
दिग्रसमध्ये शेतकरी महावितरणवर
ठळक मुद्देकृषिपंपधारक त्रस्त : वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी