शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पापलवाडीत शेतकऱ्याने फुलविली केशर शेती

By admin | Updated: March 13, 2017 00:57 IST

केशर पीक म्हणजे काश्मीर असे समीकरण झाले आहे. केशराचा दरवळ केवळ काश्मीर, राजस्थान आणि गुजरातमध्येच येवू शकतो,

राज्यातील पहिला प्रयोग : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आशादायी चित्र, केशर शेती पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी संजय भगत ल्ल महागाव केशर पीक म्हणजे काश्मीर असे समीकरण झाले आहे. केशराचा दरवळ केवळ काश्मीर, राजस्थान आणि गुजरातमध्येच येवू शकतो, अशी विदर्भातील शेतकऱ्यांची धारणा. परंतु या धारणेला खोटे ठरवत महागाव तालुक्यातील पापलवाडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात केशरची लागवड केली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील हा पहिला प्रयोग असावा. महागाव तालुका हा शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यातीलच पापलवाडी येथील आशीष भीमराव हेलगंड यांनी मात्र केशर शेतीतून प्रगतीचा नवा मार्ग शोधत आत्महत्येच्या वाटेवर असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवी पायपाट तयार केली आहे. पापलवाडी हे हजार लोकसंख्येचे गाव. मुडाणा ते गौळ रस्त्यावर आडवळणाला आहे. परंतु आता हे गाव केशर शेतीसाठी ओळखले जावू लागले आहे. प्रयोगशील शेतकरी आशीष हेलगंड यांना गुजरातमधील त्यांच्या नातेवाईकाकडून केशर शेतीची प्रेरणा मिळाली. अन्य राज्यातील केशर उत्पादनाचा अनुभव घेवून त्यांनी आपल्या शेतीत केशर पिकविण्याचे धाडस केले. सहा गुंठ्यात केशराची लागवड केली. त्यासाठी लागणारे बियाणेही गुजरातमधील आपल्या नातेवाईकांकडून आणले. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या या लागवडीला गव्हासारखे पाणी दिले. फेब्रुवारी महिन्यापासून केशराला फुले येण्यास सुरुवात झाली. आता या शेतातील शेतात केशरी रंगांची उधळण सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत फुले तोडून वाळू घालावी लागणार आहे. सहा गुंठ्यात साधारणत: पाच ते सहा किलो केशरचे उत्पादन अपेक्षित आहे. सहा गुंठ्यात तीन लाखांचे उत्पन्न सहा गुंठ्यात पिकलेले केशर जवळपास तीन लाख रुपयांचे उत्पन्न देणार असल्याचा दावा हेलगंड यांनी केला. करडीसारखे दिसणारे पीक पाहून कुणालाही केशर पीक असल्याची शंका येत नाही. तसेच जनावरे किंवा आणखी कोणताही त्रास नाही. काढायला सोपे असते. अमेरिकन केशर जोधपूर या नावाने असलेले हे बियाणे होय. लागवडीसाठी हजार बी आणले होते. पाच बाय दीड फुटात त्याची लागवड केली. ३० रुपयाला एक बी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.