शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्याच्या मृत्यूने कुटुंब संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 22:03 IST

वर्तमान युगात सरकारी नोकरीला जादा महत्त्व दिले जाते. नोकरी लागली म्हणजे संपूर्ण कुटुंबाची आयुष्याची चिंता मिटली, असे समजले जाते. मात्र आता दुर्दैवाने नोकरीवर असलेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे काय हाल होऊ शकतात, याचे वास्तव सर्वांसमोर मांडणारी घटना दारव्हा येथे घडली.

ठळक मुद्देदारव्हा येथील प्रकार : पेन्शन, उत्पन्नाचे साधन नाही, पत्नीवर कोसळले आभाळ

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वर्तमान युगात सरकारी नोकरीला जादा महत्त्व दिले जाते. नोकरी लागली म्हणजे संपूर्ण कुटुंबाची आयुष्याची चिंता मिटली, असे समजले जाते. मात्र आता दुर्दैवाने नोकरीवर असलेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे काय हाल होऊ शकतात, याचे वास्तव सर्वांसमोर मांडणारी घटना दारव्हा येथे घडली.येथील आरोग्य विभागात परिचर असलेल्या अमोल गावंडे यांचा काही दिवसांपूर्वी आजाराने मृत्यू झाला. घरातला कर्ता पुरुष अचानक सोडून गेल्याने गावंडे कुटुंबावर आघात झाला. त्यांची आई, पत्नी, दोन मुलांना आधारच उरला नाही. कुटुंबाकडे केवळ दोन एकर शेती होती. अमोलच्या आजारपणात ती विकावी लागली. दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे घरातील महिलांवर जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. घर खर्च भागवायला पैसे नाही. त्यात दोन मुलांचे शिक्षण, म्हातारी सासू हा सर्व भार कसा सोसावा, याची चिंता अमोलची पत्नी निता गावंडे यांना सतावत आहे.दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे आता पतीच्या निधनाचे आभाळभर दुख: विसरून हे आव्हान निता यांनी स्विकारले. स्वाभिमानाने जगण्यासाठी निता यांना कुठलेही श्रम करण्यात कमीपणा वाटत नाही. कुटुंबासाठी त्यांनी कुणाच्याही मदतीची प्रतीक्षा न करता संघर्ष सुरू केला आहे. मात्र त्यांच्या एकाकी संघर्षामुळे महागाईच्या जमान्यात कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न मिटू शकत नाही. त्याचबरोबर वडिलांचे छत्र हिरावून घेतलेल्या मुलांचे पालन पोषण, शिक्षणाचा खर्च, म्हातारी सासू या सर्व जबाबदाºया नितावर येऊन पडल्या. त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नाही. निता यांना शासन तसेच लोकप्रतिनिधींकडून कुटुंबाची कायमस्वरूपी व्यवस्था होईल, अशा सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संकट काळात या कुटुंबाला विविध माध्यमातून मदतीची गरज आहे.विविध संघटना पुढे सरसावल्यानिता गावंडे यांची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या येथील शाखेने गावंडे कुटुंबाला आर्थिक सहकार्य करण्यात आले. संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल झाडे, दिनेश शिंदे, विशाल हांडे, कल्पक देशमुख, श्रीकांत सहारे, प्रमोद दुधे, ओंकार निमकर, राम पापळकर यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनीसुद्धा आर्थिक सहकार्य केले.जुनी पेन्शन योजना आवश्यक२००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद करण्यात आली. मात्र कर्मचाºयांना पेन्शन मिळणे किती आवश्यक आहे, हे अमोल गावंडे यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीवरून दिसून येते. पेन्शन योजना सुरू असती, तर अमोलच्या मागे कुटुंबाला आधार मिळाला असता. त्यामुळेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा सुरू असल्याचे विशाल झाडे यांनी सांगितले.