शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

माफियांवर आवळला फास

By admin | Updated: May 13, 2015 02:09 IST

जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी धाडसत्र सुरू केले.

कळंब : जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी धाडसत्र सुरू केले. मंगळवारी कळंब तालुक्यातील बऱ्हाणपूर घाटावर धाड टाकून सहा ट्रेझर बोट, दोन जेसीबी मशीन आणि नऊ ट्रक जप्त केले. कंत्राटदाराला दोन लाख ३२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी रेती घाटावर धाड मारण्याची जिल्ह्यातील ही तिसरी कारवाई होय. यवतमाळ जिल्ह्यात रेती घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त होत आहे. गत महिन्यात बाभूळगाव तालुक्यातील नांदेसावंगी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी धाड मारुन कारवाई केली. त्या पाठोपाठ कळंब तालुक्यातील हिवरा दरणे रेती घाटावर धाड मारली. उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील रेती घाटावर धाड मारण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आपला मोर्चा कळंब तालुक्यातील बऱ्हाणपूर रेती घाटाकडे वळविला. अंगरक्षकाला घेऊन दुचाकीने रेती घाट गाठला. या ठिकाणी होत असलेले उत्खनन पाहून जिल्हाधिकारी अचंबित झाले. जेसीबी मशीन आणि ट्रेझर बोटच्या सहाय्याने येथे उत्खनन सुरू होते. तसेच ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठेही करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन जेसीबी, सहा ट्रेझर बोट आणि नऊ ट्रक जप्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी जप्तीची कार्यवाही प्रारंभ केल्यानंतर कळंबचे तहसीलदार आणि कर्मचारी रेती घाटावर पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धाडसत्रामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बऱ्हाणपूर येथील अवैध रेती उत्खननाची तपासणी केल्यानंतर कंत्राटदार चेतन डहाके यांना दोन लाख ३२ हजार रुपये दंंड ठोठावण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)तहसीलदारांना खुलासा मागणार एकाच महिन्यात तब्बल दोन वेळा कळंब तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी रेती घाटावर धाड मारली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू असताना तहसील प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. खुद्द जिल्हाधिकारी पोहोचल्यानंतर तहसीलदार घाटावर पोहोचतात. अवैध रेती उत्खननाबाबत संबंधित तहसीलदारांकडून खुलासा मागविणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सांगितले.