शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारातील मजुरांचे तुंगे हद्दपार

By admin | Updated: July 27, 2016 00:33 IST

पिकांमध्ये वाढलेले तणनियंत्रण शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या असून आतापर्यंत मजुरांच्या हाताने निंदण करून तणांचे नियंत्रण केले जात होते.

तणनाशकांचा वाढता वापर : मजुरांचा हक्काचा रोजगार हिरावला, दोन पाळीत चालत होते काम पांडुरंग भोयर सोनखास पिकांमध्ये वाढलेले तणनियंत्रण शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या असून आतापर्यंत मजुरांच्या हाताने निंदण करून तणांचे नियंत्रण केले जात होते. गावागावात मजुरांचे तुंगे दिसत होते. यातून शेतातील तणनियंत्रण वेगाने होत होते. मजुरांना हक्काची रोजी मिळत होती. परंतु अलिकडे तणनाशकांचा वापर वाढला असून मजुराऐवजी ‘स्प्रे’ करून तणनियंत्रण केले जाते. यात मात्र मजुरांच्या हक्काचा रोजगार हिरावल्याचे गावागावात दिसते. खरीप हंगामात पिकातील तणनियंत्रण करण्यासाठी गत तीन-चार वर्षापर्यंत मजूर शेतात राबत होते. विळ्याच्या मदतीने मजूर निंदण करायचे. यातून मजुरांना चांगला रोजगार मिळायचा. घरातील सर्व मंडळी मजुरीवर जायची. कालांतराने यात तुंगा पद्धत आली. गावातील १५ ते २० मजूर एकत्र करून त्यांचा प्रमुख शेतकऱ्यांकडून ठेका घेत होता. यातून मजुरांना चांगली मजुरी मिळत होती. काही भागात तर दोन पाळीत निंदण चालायचे. सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ११ ते ५ या वेळात निंदण केले जायचे. यातून एका आठवड्याला ७०० ते ८०० रुपये मजुरी एका मजुराला मिळत होती. या तुंग्याच्या प्रमुखाला ग्रामीण भागात मेटकर असे म्हणतात. हा मेटकर या संपूर्ण मजुरांवर नियंत्रण ठेवून शेतात काम करतो. त्यासाठी त्याला प्रत्येक मजुरामागे शेतमालक १० रुपये देत होता. यामुळे शेतात शेतमालकाला जाण्याचीही गरज नव्हती. शेतातील निंदणही व्यवस्थित होत होते. त्यामुळे गावागावात तुंग्यांचे पीक फोफावले होते. काही तुंग्यात तर १०० पर्यंत मजूर दिसत होते. एका दिवसात १० एकराचे शेत निंदून काढण्याची क्षमता या तुंग्यांमध्ये होती. त्यामुळे गावातच नाही तर परगावातही तुंग्याने मागणी यायची. ट्रॅक्टरद्वारे मजुरांना शेतापर्यंत नेले जायचे. मात्र आता तुंगा हद्दपार होण्याच्या मार्गावर आला आहे. त्याचे कारण म्हणजे तणनाशकांचा वाढता वापर होय. अलिकडे मजूर मिळणे कठीण झाले, अशी हाकाळी शेतकरी ठोकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता निंदणाऐवजी थेट तणनाशक वापरण्याचा फंडा सुरू केला आहे. शेतातील पिकांच्या तासामध्ये तणनाशक फवारले जात आहे. त्यामुळे तणाचे नियंत्रण होते. परंतु या तणनाशकातील विषारी रसायनाचा दीर्घकालीन परिणाम जमिनीवर होतो. परंतु अगदी कमी पैशात तणनियंत्रण होत असल्याने शेतकरी सध्या तणनाशकाकडे वळले आहे. त्यातच विविध तणनाशक कंपन्या शेतकऱ्यांना जाहिरातीच्या माध्यमातून भुरळ घालत आहे. परिणामी मजुरांच्या हक्काचा रोजगार हिरावला असून अनेकजण आता मिळेल ते काम करण्याच्या मानसिकतेत आहे. असा असायचा तुंगा नेर तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी तुंगा पाहायला मिळतो. परंतु पाच वर्षापूर्वी गावागावात तुंग्याचे पीक आले होते. तुंग्याचा प्रमुख मेटकर गावातील मजुरांना एकत्र करायचा. त्यांच्यावतीने शेतमालकाकडून निंदणाचा ठेका घ्यायचा. आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी मजुरांना मजुरी दिली जायची. शेतकरी आणि मजूर यांच्यातील दुवा म्हणून मेटकर काम करायचा. गावातील मजुरांना एक प्रकारे जगविण्याचे कामच या मेटकराच्या माध्यमातून होत होते. आता तुंगाही हद्दपार झाला अन् मेटकरही.