शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

खाद्य तेलाच्या फॉर्च्यून ब्रॅन्डची बनावट विक्री

By सुरेंद्र राऊत | Updated: July 29, 2024 18:27 IST

यवतमाळचे कनेक्शन नागपूरशी : नागपूरमध्ये उघड झाला होता बनावट ब्रॅन्डचा खाद्य तेल कारखाना

यवतमाळ : शहरातील मुख्य बाजारपेठेसह किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये झाडाझडती घेऊन फॉर्च्यून ब्रॅन्ड असलेल्या कंपनीच्या पथकाने बनावट खाद्य तेल विक्री होत असल्याचा प्रकार उघड केला. त्यानंतर हा मुद्देमाल जप्त करून विक्री करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. स्थानिक गुन्हे शाखा याचा तपास करीत आहे. फॉर्च्यून ब्रॅन्डचा बनावट डबा तयार करून तेल विक्री केल्याचा प्रकार नागपूरमध्ये मे महिन्यात उघड झाला. असा कारखानाच हाती लागला होता. त्यामुळे यवतमाळचे कनेक्शन नागपूरशी असल्याचा दाट संशय आहे.

फॉर्च्यून कंपनीचे निरीक्षक अनुप कोलप यांनी १४ मे रोजी लकडगंज पोलिस ठाणे नागपूर येथे तक्रार दिली होती. त्यावरून वासुदेव खंडवाणी, मोरेश्वर घुमडे, अतुल रायचुरा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच गुन्ह्याचा तपास करताना यवतमाळातील लिंक हाती लागली.

त्यानंतर फॉर्च्यून कंपनीचे निरीक्षक अनुप कोलप व त्यांचे सहकारी यवतमाळातील बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या तेलावर लक्ष ठेऊन होते. कंपनीच्या अधिकृत डिलरकडून फॉर्च्यून ब्रॅन्डच्या सोयाबीन, सूर्यफूल, फल्ली या तेलांची मागणी आणि बाजारात होत असलेली विक्री यात बऱ्याचअंशी तफावत आढळून आली. फॉर्च्यून ब्रॅन्डच्या नावाने बनावट डबे तयार करून विक्री होत असल्याचा प्रकार लक्षात आला. या संपूर्ण प्रकाराची गोपनीय माहिती घेऊन नंतर फॉर्च्यून ब्रॅन्डच्या निरीक्षक पथकाने पोलिस अधीक्षकांपुढे ही धक्कादायक माहिती सांगितली. त्यावरून शनिवारी यवतमाळ शहरात धाडसत्र राबविण्यात आले. यात मोठा बनावट तेलसाठा हाती लागला. या प्रकरणी चौघांवर यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण १ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा बनावट तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे व त्यांचे पथक करीत आहे.

नऊ महिन्यापूर्वीच बनावट खाद्य तेल विक्रीची दिली होती सूचनायवतमाळ शहरासह जिल्ह्यात फॉर्च्यून ब्रॅन्डच्या नावाने बनावट खाद्य तेलाची विक्री होत असल्याचा प्रकार नोव्हेंबर २०२३ मध्ये निर्देशनास आला होता. अन्न सुरक्षा व निरीक्षण अधिकाऱ्याने याबाबतची सूचना फॉर्च्यून कंपनीतील एका अधिकाऱ्याला दिली होती. अन्न सुरक्षा व निरीक्षण अधिकाऱ्यांकडून खाद्य तेलाची पडताळणी साधारणत:च्या काळात केली जाते. यामध्ये नमुने घेतले असता ब्रॅन्डच्या नावे बनावट तेल विक्री होत असल्याचा संशय आला. मात्र याची दखल फॉर्च्यून कंपनीच्या प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या ब्रॅन्डचा वापर करून बनावट खाद्य तेल विक्री करणारे रॅकेट मोकाट होते.

अन्न सुरक्षा विभागही करणार पडताळणीब्रॅन्डच्या नावाने बनावट खाद्य तेल विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. याची दखल अन्न सुरक्षा विभागानेही घेतली असून जिल्ह्यात सर्वच ठिकाणी खाद्य तेल विक्रीच्या विविध ब्रॅन्डचे नमुने घेतले जाणार आहे. किरकोळ विक्रेत्यांनी खाद्य तेल घेताना अधिकृत घाऊक वितरकाकडूनच तेल खरेदी करावे, सोबत पक्के बिल घ्यावे अन्यथा अशाही प्रकरणात कारवाई केली जाईल, असे सहायक अन्न सुरक्षा आयुक्त गोपाल माहोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूरYavatmalयवतमाळ