शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

सरकारी शाळांमध्ये सुविधांची बोंबाबोंब

By admin | Updated: July 11, 2015 00:11 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे.

संगणक संच धूळ खात : जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची गळतीकळंब : जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. अलीकडे काही वर्षातील विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांवरील पालकांचा विश्वास उडत असल्याचे दिसून येते. परिणामी विद्यार्थ्यांची होणारी गळती ही शिक्षणतज्ज्ञांसाठी चिंतेची बाब झाली आहे.ग्रामीण भागात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावणारी संख्या ही तफावत अधोरेखित करणारी आहे. बहुतांश शाळांमध्ये शौचालय, विद्युत पुरवठा, अपंगांसाठी रॅम्प, खेळांचे मैदान यांचा अभाव आहे. शाळेला पुरविण्यात आलेले संगणकही शोभेची वस्तू ठरले आहे. याला काही शाळा अपवाद असतीलही. पण शाळा तपासणीसाठी कोणी आला तरच संगणकावरील धुळ झटकली जाते, ही वास्तविकता नाकारता येणार नाही. एवढेच नव्हे, तर अजूनही काही शाळांना संगणकाची प्रतीक्षा आहे. यासाठी ते लोकप्रतिनिधींकडे वांरवार मागणी करीत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये किचन शेडच नाही. जेथे आहे त्याची अवस्था बिकट आहे. फार कमी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. कुठल्याही शाळेत पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. गणवेश वाटपामध्येही नेहमीच विलंब होतो. यावरून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांची अवस्था बिकट असल्याचे स्पष्ट होते. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिल्यास पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पटसंख्या रोडावत चालल्याचे दिसून येते. याउलट खासगी शाळांमध्ये भरमसाठ फी असतानाही विद्यार्थ्यांनी संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक पालकांचा विश्वास गमावत आहे, असे म्हणावे लागेल. विद्यार्थी संख्या रोडावण्याऱ्या मुलभूत कारणांची कारणमिमांसा करण्यात शिक्षण विभाग कमी पडत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे शिक्षकवर्गही केवळ पगारासाठी येतात, विद्यार्थ्यांप्रती त्यांची खास बांधिलकी नसते, असा आरोपही पालकातून होत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. (तालुका प्रतिनिधी)