शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीला मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:27 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असताना शासनाने खरेदी बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. खरेदी बंदचा निर्णय मागे घेऊन तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आर्जव : घरांमध्ये शेकडो क्विंटल तूर पडून

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असताना शासनाने खरेदी बंद केल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. खरेदी बंदचा निर्णय मागे घेऊन तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू केली. त्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. मात्र आॅनलाईन नोंदणी करूनही अद्याप अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली नाही. गोदामात तूर साठवायला जागा नसल्याने शेकडो क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. दुरीकडे नोंदणी केलेले शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शासनाने खरेदी बंद केल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांकडे अद्यापही शेकडो क्विंटल तूर साठवून आहे.आता घरात साठवलेली तूर विकावी कुठे, असा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी तुरीचे दर पाडले आहे. घसरलेल्या दरात तुरीची विक्री केल्यास मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे तूर शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच खरीप हंगाम तोंडावर येत आहे. या हंगामासाठी बियाणे, कीटकनाशके घेण्याची तजवीज शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. मात्र शेतमाल घरीच पडून असल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. यामुळे सरकारने तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.काँग्रेसतर्फे निवेदनतूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन तालुका काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, सिद्धार्थ गडपायले, मनमोहनसिंग चव्हाण, विजय गोकुळे, विजय वानखडे, रघुनाथ जाधव, गुलाबराव चव्हाण, उत्तमराव गोमासे, राजेंद्र चवात, अशोक देशमुख, रामहरी गावंडे, रकमत खाँ पठाण, वसंतराव सवाई, हरसिंग चव्हाण, शालीग्राम मुधाने, भाऊ कटके, छोटू देशमुख, सुनील मेश्राम, भाऊ जयस्वाल यांच्यासह तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.