शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रगलॅन्ड’च्या स्फोटाने हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 21:56 IST

मुंगोली खुल्या कोळसा खाणीत कोळशाच्या उत्खननासाठी अजस्त्र अशा ड्रगलॅन्ड मशीनचा होत असलेला वापर शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. या मशीनद्वारे होणाºया स्फोटाने मोठ-मोठे दगड परिसरातील शेतात येऊन पडत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांचे जीव धोक्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचे नुकसान : कापूस काळवंडला, तुरीचा बहार गळालालोकमत न्यूज नेटवर्कवणी : मुंगोली खुल्या कोळसा खाणीत कोळशाच्या उत्खननासाठी अजस्त्र अशा ड्रगलॅन्ड मशीनचा होत असलेला वापर शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. या मशीनद्वारे होणाºया स्फोटाने मोठ-मोठे दगड परिसरातील शेतात येऊन पडत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांचे जीव धोक्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर स्फोटानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणावर उडणारी धूळ परिसरातील शेतात उभ्या असलेल्या कपाशीला काळवंडून टाकत आहे. या स्फोटाने मुंगोली, शिवणीसह अनेक गावांना हादरे बसत आहेत. त्यामुळे गावकरी भयग्रस्त आहेत.कोळसा खाणीत स्फोट करण्यासाठी अजस्त्र जमिनीचा पोतही बिघडत असल्याने भविष्यात या भागातील शेती अस्थिपंजर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिसरातील शेतांमध्ये सध्या तूर व कपाशीचे पीक उभे आहे. ड्रगलॅन्ड मशीनने स्फोट केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कोळशाची धूळ उडते. ती परिसरातील कपाशीचे पीक व तूर पिकावर बसते. त्यामुळे कापूस काळवंडत असून तुरीच्या बहराला गळती लागली आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत चौैकशी करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.सरपंचाची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रारयासंदर्भात मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे यांनी बुधवारी वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली अनेकदा तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कायदा हातात घ्यायचा का, असा संतप्त सवाल त्यांनी तक्रारीतून उपस्थित केला आहे. वेकोलिच्या मनमानी कारभाराला पायबंद घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.

टॅग्स :cottonकापूस