शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य एसटी गाड्यांवर डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:27 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिद्र जोपासणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ सध्या भंगार अवस्थेत रस्त्यावरून धावत आहे. या भंगार बसेसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचा विकास केला जात असला तरी वणी आगारातील ५० टक्के बसेस कालबाह्य झाल्या असून त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. याच कारणाने वणीची लालपरी संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देवणी आगार : ५० टक्के बसेस भंगारात, आगारप्रमुखाचे पदही ‘प्रभारी’च

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिद्र जोपासणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ सध्या भंगार अवस्थेत रस्त्यावरून धावत आहे. या भंगार बसेसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचा विकास केला जात असला तरी वणी आगारातील ५० टक्के बसेस कालबाह्य झाल्या असून त्या अखेरच्या घटका मोजत आहेत. याच कारणाने वणीची लालपरी संकटात सापडली आहे.सर्वांत श्रीमंत महामंडळ म्हणून एस.टी.महामंडळाकडे पाहिले जाते. मात्र महामंडळाला नियोजनशून्यतेमुळे तोट्याचा सामना करावा लागतो. अशाही परिस्थितीत जास्त उत्पन्न देणारे आगार म्हणून वणी आगाराची ओळख आहे. सुसज्ज व स्वच्छ वातावरण, भरपूर जागा असलेला हा आगार आहे. २०१८ मध्ये या आगाराचे उत्पन्न ८९ लाख ७५ हजार ४६७ एवढे झाले. परंतु यावर्षी २०१९ मध्ये उत्पन्नात घट झाली असून यावर्षीचे उत्पन्न केवळ ७७ लाख ४६ हजार ३३० रुपये ईतके आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वणी आगाराला १२ लाख २९ हजार १३७ रुपये तोटा सहन करावा लागला आहे.या आगारामध्ये पाच वर्षांपासून नवीन बसेस आल्याच नाहीत. येथील आगारात निळ्या व लाल रंगाच्या बसेस आहेत. त्यात मानव विकास मिशनच्या १२ बसेस आहेत. ४० लाल रंगाच्या बसेस आहेत. यांपैकी ४५ बसेस सध्या सेवा देत असून सात बसेस पासींगसाठी जिल्हा आगारात पाठविण्यात आल्या आहेत. एक शिवशाही बस वणी येथून नागपूर या मार्गावर धावते. दुसरी शिवशाही बस अकोलासाठी सोडण्यात येत होती. परंतु या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करण्यात आली आहे.या आगारामधील २५ बसेस आजवर १० ते १२ लाख किलोमिटर धावल्या असून त्यामुळे त्या आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. या आगारामध्ये संपूर्ण परिसरासाठी व लांब पल्ल्यावर पाठविण्यासाठी ५२ बसेसची आवश्यकता आहे. परंतु नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेसना दुरूस्त करून त्याद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. गेल्या एक वर्षापासून आगार प्रमुखाचे पद रिक्त असून सध्या या आगाराचा कारभार प्रभारावरच सुरू आहे. या आगारावर कुणाचे नियंत्रण नसल्याने सकाळ पाळीतील बसेसही वेळेवर सुटत नाहीत.प्रवासी वाढविण्यासाठी महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र त्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोट्यवधी रूपये खर्च करून वणीत बसस्थानक उभारण्यात आले. भंगार बसेसमुळे प्रवाशांचा ओढा खासगी बसमधून प्रवास करण्याकडे होत असल्याचे दिसून येत आहे.वणी आगारात मोठ्या प्रमाणात अडचणी वाढत असल्याचे प्रवासी बोलतात. परंतु त्याचे निराकरण करण्यासाठी प्रवासी वर्गाचे काही कर्तव्य आहे. त्यांनी आगारासंदर्भातील आपल्या तक्रारी तक्रार पेटीत टाकल्या, तर त्यावर कार्यवाही करता येणार आहे.- एस.एस.टिपले,प्रभारी आगार प्रमुख.