शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उजाड उद्यानांवर महिन्याकाठी दीड लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:53 IST

शहरातील प्रमुख नऊ उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीचे कंत्राट नगरपरिषदेने दिले आहे. आतापर्यंत यावर लाखो रूपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्ष कोणतीच सुविधा या उद्यानांमध्ये नाही. महिन्याकाठी एक लाख ६० हजार रुपये खर्च होत असलेल्या उद्यानांची स्थिती अतिशय बकाल झाली आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद नियोजन विभाग : देखभाल नसतानाही कंत्राटदारांची देयके नियमित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील प्रमुख नऊ उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीचे कंत्राट नगरपरिषदेने दिले आहे. आतापर्यंत यावर लाखो रूपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्ष कोणतीच सुविधा या उद्यानांमध्ये नाही. महिन्याकाठी एक लाख ६० हजार रुपये खर्च होत असलेल्या उद्यानांची स्थिती अतिशय बकाल झाली आहे. यावर कोणीही आजतागायत आक्षेप घेतला नाही. स्वच्छ सुंदर शहर याचा गजर करणाऱ्या पालिकेचे उजाड उद्यानाक डे कधी लक्ष गेले नाही. इतकेच नव्हे तर काम होत नाही म्हणून कोणत्याच कंत्राटदाराची देयके थांबविली नाही. हिवाळ््यात ही उद्याने सुकली आहे. कोणतीच सुविधा येथे नाही. शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी उद्यानाची अवस्था अतिशय बकाल झाली आहे. येथील खेळणी पूर्णत: तुटली आहे. लॉन सुकले, येथे लावलेल्या शिवाजी महाराजांच्या तैल चित्राची दुरावस्था आहे. एकीकडे कायम आर्थिक टंचाईत असल्याचे सांगणाऱ्या पालिका प्रशासनाने या उजाड उद्यानावर महिन्याला २४ हजार ५०० रुपये खर्च झाल्याचे दाखवून देयके काढली आहे. कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती नेहरू बाल उद्यानाची आहे. त्यावर महिन्याला २४ हजार ८५० रूपये खर्च केला जातो. नेहरू मंचावर १३ हजार ५०० रूपये, वॉर्ड क्रमांक ३४ शास्त्रीनगर येथील उद्यानावर १७ हजार ३०० रूपये, आयुर्वेदिक दवाखान्यावर १४ हजार ८००, शिंदे प्लॉट उद्यानावर १६ हजार ९००, अग्रवाल ले-आऊट उद्यानावर १६ हजार ७००, पत्रकार कॉलनी उद्यानावर १४ हजार ५०० रुपयांचा खर्च होत आहे. एकूण उद्यानावर महिन्याला एक लाख ६० हजार रूपये खर्च केले जात आहे. वर्षभरात नगरपरिषद नियोजन विभागाने १९ लाख १७ हजार रूपये उद्यान देखभालीवर खर्च केले आहेत. त्यानंतरही येथील बहुतांश उद्याने उजाड आहेत. स्थानिक नगरसेवकही प्रभागातील उद्यानाकडे फिकरत नाही काय, असा प्रश्न उपस्थित होते.शहरातील शिवाजी उद्यानाची स्थिती बिकट आहे. याप्रमाणेच इतर उद्यानाची पाहणी करून दोष कुणाचा याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.- शुभांगी हातगावकरसभापती नियोजन समितीनगरपरिषद, यवतमाळ