शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एक कोटी रुईगाठींची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:16 IST

राज्यात यावर्षी कपाशीचा पेरा काहीसा घटला असला तरी समाधानकारक पावसामुळे कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यातून राज्यात सुमारे एक कोटी रूईगाठींचे उत्पादन होण्याची अपेक्षा कॉटन क्षेत्रातील उद्योजक व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देकपाशीचे उत्पादन वाढणारखरेदीसाठी सीसीआय, नाफेडवर जोर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात यावर्षी कपाशीचा पेरा काहीसा घटला असला तरी समाधानकारक पावसामुळे कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यातून राज्यात सुमारे एक कोटी रूईगाठींचे उत्पादन होण्याची अपेक्षा कॉटन क्षेत्रातील उद्योजक व्यक्त करीत आहेत.देशभरात दरवर्षी एक कोटी १४ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीचा पेरा होतो. यावर्षी त्यात दोन लाख हेक्टरची घट झाली आहे. परंतु त्यानंतरही कपाशीच्या उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम पडणार नाही. कारण शासनाने बी-बियाण्यांमध्ये विविधता उपलब्ध करून दिली. पाऊस चांगला आहे. निवडक क्षेत्र वगळता बोंडअळीचा प्रकोप तेवढा नाही. त्यामुळे यावर्षी देशभरात तीन कोटी ७५ लाख रुईगाठींच्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात दहा लाख गाठींची भर पडणार आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा एक कोटी गाठींचा आहे. गेल्यावर्षी राज्यात ८० ते ८५ लाख गाठी झाल्या होत्या. यावर्षी त्यात भर पडणार आहे. राज्यात कपाशीचे क्षेत्र ४२ लाख हेक्टरवर विस्तारले आहे.केंद्र शासनाने कापसाला पाच हजार ४०० रुपये प्रति क्ंिवटल हमी भाव जाहीर केला आहे. परंतु कॉटन, टेक्सटाईल, जिनिंग, स्पिनिंग या क्षेत्रातील मंदीच्या लाटेमुळे सर्व उद्योग डबघाईस आले आहे. त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भावापेक्षा फार अधिक दर मिळण्याची शक्यता नाही. एवढ्या जास्त हमी भावात कापसाची निर्यात शक्य होत नाही. तर दुसरीकडे देशात टेक्सटाईल उद्योग थंड पडल्याने रूईगाठींना तेवढी मागणी राहणार नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय), नाफेड मार्फत पणन महासंघ यावरच अवलंबून रहावे लागण्याची चिन्हे आहे.कॉटन उद्योग डबघाईसगेल्या वर्षीही बाजारात चांगल्या कापसाला पाच हजार ५०० रुपयांचा भाव होता. डॉलरच्या भावात होणारी वाढ लक्षात घेता काही प्रमाणात रूईगाठींची निर्यात होण्याची शक्यताही कॉटन उद्योजक व्यक्त करीत आहे. मंदीच्या लाटेमुळे जिनिंग, प्रेसिंग, सहकारी सूत गिरण्या, कापड उद्योग डबघाईस आले आहे. मोठ्या उद्योगातही तीन ऐवजी एक शिप्ट चालविली जात आहे. यावरून या इंडस्ट्रीजची गती व स्थिती लक्षात येते.

टॅग्स :cottonकापूस