शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पेजप्रमुख’ मोहिमेच्या माध्यमातून पक्षविस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:03 IST

लोकसभा, विधानसभा व मनपा निवडणुकांमध्ये एकहाती यश मिळाल्यावरदेखील भाजपच्या पक्षविस्ताराला पक्षश्रेष्ठींना अपेक्षित यश मिळालेले नाही.

ठळक मुद्देभाजप आठवडाभर राबविणार मोहीम : बैठकीत झाले मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा, विधानसभा व मनपा निवडणुकांमध्ये एकहाती यश मिळाल्यावरदेखील भाजपच्या पक्षविस्ताराला पक्षश्रेष्ठींना अपेक्षित यश मिळालेले नाही. ‘बूथविस्तारक’ योजना राबविल्यानंतर आता भाजपातर्फे ‘पेजप्रमुख’ मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील मतदारांची संख्या लक्षात घेता मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एक प्रमुख नेमण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांची फौज लागणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पक्षाच्या विस्तारावर भर देण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या आहेत. रविवारी भाजपच्या शहर पदाधिकाºयांच्या बैठकांचे सत्र चालले व काहीशा सुस्तावलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद भरण्यासाठी ‘पेजप्रमुख’ मोहीम पुढील आठवडाभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले.मनपा निवडणुकांच्या वेळची स्थिती लक्षात घेतली तर नागपूर शहरातील मतदारांची एकूण संख्या २० लाख ९३ हजार ३९२ इतकी होती. मतदार यादीतील एका पानावर सुमारे ३० मतदारांची नावे असतात. अशा स्थितीत संपूर्ण मतदार यादीसाठी ६९ हजार ७८० पेजप्रमुख नेमावे लागणार आहेत. यासाठी सक्षम कार्यकर्ते लागणार आहेत. शहरातील काही भागांमधील ‘बूथ’वर कार्यकर्त्यांची कमतरता आहे हे वास्तव आहे. त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना पक्षात घेताना त्यांच्याकडे जबाबदारी देऊन विश्वास निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार आहे. या माध्यमातून पक्षविस्तारदेखील होईल व नवे कार्यकर्तेदेखील जुळतील, अशा पद्धतीने प्रयत्न करण्याचे निर्देश शहराध्यक्षांकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, रविवारी गणेशपेठस्थित पक्ष कार्यालयात चार वेगवेगळ्या बैठका पार पडल्या. यात शहर पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, महामंत्री, विस्तारक, प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक, युवा मोर्चा, महिला आघाडी यांचे पदाधिकारी समाविष्ट होते. विविध पातळ््यांवर बैठका घेऊन पेजप्रमुख मोहिमेसंदर्भात सूचना देण्यात आल्या. १५ आॅक्टोबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. पूर्व, दक्षिण व मध्य नागपूरची जबाबदारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडे तर उत्तर, पश्चिम व दक्षिण-पश्चिमची जबाबदारी जयप्रकाश गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रविवारी झालेल्या बैठकांमध्ये शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, संदीप जाधव, महामंत्री संदीप जोशी, किशोर पलांदूरकर, संघटनमंत्री भोजराज डुम्बे, दयाशंकर तिवारी, प्रमोद पेंडके, महिला आघाडी अध्यक्षा डॉ.किर्तीदा अजमेरा, शहर प्रचारप्रमुख चंदन गोस्वामी यांच्यासह विविध पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.‘वॉररुम’सोबत जोडणार ‘पेजप्रमुख’शहरातील १ हजार ९१४ बूथवर ‘पेजप्रमुख’ बनविण्यात येणार आहेत. प्रत्येक ‘बूथ’वर साधारणत: २५ कार्यकर्ते लागणार आहेत. या पेजप्रमुखांची पडताळणी झाल्यानंतर मुंबईत पक्षाने स्थापन केलेल्या ‘वॉररुम’कडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल. विशेष म्हणजे ही ‘वॉररुम’ची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे.