यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पुणे विदर्भ विभागांतर्गत विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी राजेंद्र बनसोड यांची निवड झाली. त्यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. यात जिल्हा सचिव संविधान कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष अंजली नालमवार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप बोरकुटे, उपाध्यक्ष प्रवीण सोनोने, महिला उपाध्यक्ष शरयू पांपट्टीवार, रजनी पोयाम, सहसचिव अक्षय गहूकार, समन्वयक मनोहर शहारे, संघटन प्रमुख स्मिता भोयटे, प्रसिध्दीप्रमुख गणेश गुजर, सल्लागार महेश कुलकर्णी, संपर्कप्रमुख सुनील थूल, कोषाध्यक्ष अमोल ठाकरे, तर संघटक म्हणून सुनील आडे, विजय बिंदोड, आशिष पंधरे याची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून अर्चना वासेकर, अतुल ढोणे, प्रकाश ठाकरे, मनोहर बडवे यांचा समावेश आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:42 IST