शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणामुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST

मानवी अविनाश चोले असे अपहृत चिमुकलीचे नाव आहे. सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास ती घरासमोर शेजारील चिमुकल्यांशी खेळत होती. तिचे वडील अविनाश हे शेतात गेले होते तर आई पूजा घरी होती. दुपारी वडील घरी परतल्यानंतर मानवी कुठेच दिसली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पूर्ण गावातही मानवी मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबियांनी आजूबाजूच्या शिवारातील विहिरींतही पाहणी केली. मात्र, मानवी कुठेच सापडली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क आर्णी : तालुक्यातील कुऱ्हा-डुमणी येथून तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मानवी अविनाश चोले असे अपहृत चिमुकलीचे नाव आहे. सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास ती घरासमोर शेजारील चिमुकल्यांशी खेळत होती. तिचे वडील अविनाश हे शेतात गेले होते तर आई पूजा घरी होती. दुपारी वडील घरी परतल्यानंतर मानवी कुठेच दिसली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पूर्ण गावातही मानवी मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबियांनी आजूबाजूच्या शिवारातील विहिरींतही पाहणी केली. मात्र, मानवी कुठेच सापडली नाही. अखेर अविनाश चोले यांनी पोलीस ठाण्यात मानवीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर मंगळवारी पोलिसांनी यवतमाळ येथून श्वानपथकाला पाचारण केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्णी पोलिसांनी परिसरातील जंगल पिंजून काढले. शेतशिवारामधील विहिरींमध्येही शोध घेतला. कुऱ्हा-डुमणी, भानसरा परिसरातील संशयास्पद जागीसुद्धा पाहणी केली. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत मानवीचा कुठेही शोध लागला नाही. श्वानपथकही कुऱ्हा येथे काही अंतरावर घुटमळले. त्यामुळे आता मानवीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. आर्णी पोलीस व एलसीबीचे पथक अपहरणासह गुप्तधनाच्या दिशेनेही तपास करत आहेत. ठाणेदार पितांबर जाधव, एलसीबी प्रमुख प्रदीप परदेशी यांच्या नेतृत्वात मानवीचा शोध सुरू आहे. 

मंदिर, नाल्यांचीही पाहणीमानवीच्या शोधात पोलिसांनी जंगलासह लगतची मंदिरे आणि नदी-नाल्यांचीही पाहणी केली. दोन ते तीन विहिरींचा गाळ उपसूनही शोध घेतला. जंगलातील संशयास्पद ठिकाणांची बारकाईने पाहणी केली. मात्र, अद्याप मानवी आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता अपहरणासह मानवीला गुप्तधनाच्या लालसेने तर पळवून नेले नाही ना, या दिशेनेही तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर कुऱ्हा-डुमणी येथील ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत.

 

टॅग्स :Kidnappingअपहरण