शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

रोहित्रांवर वाढला अतिरिक्त दाब

By admin | Updated: November 30, 2014 23:14 IST

खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे.

नेर : खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे. शिवाय फळबागांसाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. यावर विद्युत कंपनीकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. तालुक्यात निर्धारित वेळेशिवायसुद्धा इतरवेळी भारनियमनाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जातो. जेव्हा वीज असते तीही कमी दाबाची राहात असल्याने मोटरपंप चालत नाही. शिवाय काही प्रसंगी जळत असल्याने दुहेरी नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागवड खर्चाइतकेही उत्पादन झाले नाही. त्यामुळे वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा आणि घेतलेले कर्ज फेडायचे कसे याची चिंता लागली आहे. आता रबीचे पीक घेवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असतानाच वीज मंडळाचे भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेचे भूत मानगुटीवर बसले आहे. तालुक्यात गहू, हरभरा, भाजीपाला पिकाचे मोठे क्षेत्र आहे. शिवाय फळबागाही आहे. या पिकांना सद्यस्थितीत पाणी देण्याची अतिशय आवश्यकता आहे. परंतु दिवसभर विजेचा लपंडाव सुरू राहात असल्याने काही शेतकऱ्यांना ओलितासाठी रात्र जागावी लागते. या स्थितीत वन्य जीवांपासूनही त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्युत जोडण्या असल्याने बऱ्याच रोहित्रांवर अतिरिक्त दाब येत असल्याने पुरवठा सुरळीत ठेवण्यात ते अकार्यक्षम ठरत आहे. परिणामी कृषी पंप जळण्याचे प्रकार वाढले आहे. मोटरपंपाच्या संख्येनुसार नवीन रोहित्र बसविणे गरजेचे आहे. परंतु यासाठी अनेक अडचणी विद्युत कंपनीकडून सांगितल्या जात आहे. शिवाय छोटासा बिघाड काढण्यासाठीही कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सहकार्य मिळत नाही. अशावेळी त्यांना स्वत:च्या खिशातून खर्च भागवावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विजेसंबंधीचे प्रश्न तत्काळ निकाली काढावे, या मागणीसाठी विद्युत कंपनीला निवेदन देण्यात आले. यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी स्नेहल भाकरे, निखिल जैत, प्रवीण राठोड, सुजित कुंभारे, विशाल चहाकार, गोपाळ चव्हाण, लक्ष्मण कराळे, शंकर चव्हाण, संजय राठोड, किशोर अरसोड, विलास चव्हाण, पंडित चव्हाण आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)