शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

पुसदमध्ये कंत्राटदाराचे वनजमिनीवर खोदकाम

By admin | Updated: January 1, 2017 02:24 IST

पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने मुरुमासाठी चक्क वनजमीन खोदल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघडकीस आला आहे

जेसीबी, टिप्पर जप्त : वन गुन्हा दाखल, डीएफओंचे आदेश पुसद : पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने मुरुमासाठी चक्क वनजमीन खोदल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघडकीस आला आहे. थेट आयएफएस असलेल्या उपवनसंरक्षकांच्या आदेशावरून या कंत्राटदाराचे जेसीबी आणि टिप्पर घटनास्थळावरून जप्त करण्यात आले. पी.के. जाधव (वडते) असे या कंत्राटदाराचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध वन विभागाने ३० डिसेंबर रोजी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ डीएचजी अन्वये गुन्हा (क्र.४२/४) नोंदविला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुसद-माहूर रस्त्याच्या बांधकामाचा कंत्राट पी.के. जाधव यांना मिळाला आहे. या मार्गावर पुसदपासून काही अंतरावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी वळण रस्ता निर्माण करण्यात आला. मात्र वनजमिनीतून गेलेल्या या वळण रस्त्यासाठी काळी दौ. वनपरिक्षेत्रातील हुडी येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. या गंभीर प्रकाराबाबत अज्ञात व्यक्तीने पुसद येथील उपवनसंरक्षक अरविंद मुंडे (थेट भारतीय वनसेवा) यांना माहिती दिली. त्याची दखल घेत मुंडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. वाय. वाघवरे, वनपाल जोग, वनरक्षक गब्बरसिंग राठोड यांना घटनास्थळी पाठवून खोदकाम करणारी कुणाचीही यंत्रे असो त्यांचा मुलाहिजा न बाळगता ती जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एस.वाय. वाघवरे यांनी घटनास्थळी भेट दिली असता तेथे जेसीबीने वनजमिनीत खोदकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. तेथील गौण खनिज वाहून नेण्यासाठी घटनास्थळी टिप्परही आढळून आला. वन अधिकाऱ्यांनी हा जेसीबी आणि टिप्पर जप्त केला आहे. वळण रस्त्यासाठी खोदकाम करताना सदर कंत्राटदाराने वन खात्याची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही, हे विशेष. उल्लेखनीय असे की, पुलाच्या या बांधकाम कंत्राटात एका राजकीय व्यक्तीची भागिदारी असल्याची चर्चाही वनवर्तुळात आहे.