वणी : वणी व मारेगाव तालुक्यातील रिक्त असलेल्या ६१ पोलीस पाटलांच्या पद भरतीसाठी येत्या १२ आॅक्टोबरला दुपारी ३ ते ४.३० या वेळात येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात परीक्षा घेण्यात येणार आहे.महाविद्यालयातील एकूण १३ खोल्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी परीक्षा केंद्रावर येऊन प्रश्नपत्रिकेचे वाटप करणार आहे. त्यानंतर ते प्रश्नपत्रिका सील करून थेट यवतमाळला रवाना होणार आहे. ही परीक्षा अतिशय पारदर्शकपणे होणार असल्यामुळे उमेदवारांनी अभ्यासावर जोर दिला आहे. वणी तालुक्यातील राजूर, पुरड (नेरड), लालगुडा, कोलगाव (सा.), पळसोनी, शिरगिरी, दहेगाव (डो.), पोहणा, शेवाळा, डोंगरगाव, कायर, नायगाव (बु.), कळमना (बु.), मारेगाव (को.), रासा, मोहोर्ली, निळापूर, चिखलगाव, पठारपूर, मुंगोली, डोंगरगाव, शेलू (खु.), मानकी, नांदेपेरा, पुनवट, उकणी, मंदर, येनक, खांदला, नवेगाव, ढाकोरी, शिवणी (ज.), पिंपरी (को.), सावंगी, विरकुंड (विठ्ठलनगर), कोरंबी, घोडदरा व अहेरी येथील रिक्त असलेल्या ३९ पोलीस पाटील पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर मारेगाव तालुक्यातील मार्डी, कोसारा, पांडविहिर, कान्हाळगाव (वाई), खंडणी, सराटी, खैरगाव, कान्हाळगाव, कळमना (खु.), बोरी (खु.), हिवरधरा, खैरगाव (भेदी), गोपालपूर (खा.), पार्डी (मार्डी), दांडगाव, वनोजा (देवी), गोरज, मुक्टा, हटवांजरी, डोलडोंगरगाव, पांढरकवडा व पाथरी येथील रिक्त असलेल्या २२ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)उमेदवारांनी प्रलोभनाला बळी पडू नयेयेत्या १२ आॅक्टोबरला पाटील पदांसाठी पारदर्शकपणे परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलीस पाटील पदासाठी परीक्षा बघून काही दलालांनी वणी व मारेगाव तालुक्यात आपले पाय रोवणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला उमेदवारांनी बळी पडून आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
पाटीलकीसाठी १२ ला होणार परीक्षा
By admin | Updated: October 11, 2015 00:43 IST