शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

माजी नगराध्यक्षाच्या मुलाला धमकावून २० लाख उकळले

By admin | Updated: October 26, 2014 22:47 IST

अश्लील चाळे करण्यास भाग पाडून आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून चक्क माजी नगराध्यक्षाच्या मुलाला धमकावण्यात आले. तसेच चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी

यवतमाळ : अश्लील चाळे करण्यास भाग पाडून आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून चक्क माजी नगराध्यक्षाच्या मुलाला धमकावण्यात आले. तसेच चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन १५ ते २० लाख रुपये उकळले. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. शहराच्या राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या एका माजी नगराध्यक्षाच्या अल्पवयीन मुलाला त्याच्या मित्रानेच नादी लावले. तसेच बोळवण करून त्यास अश्लील चाळे करण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर या अश्लील चाळ्यांची व्हिडिओ चित्रफीत बनवून आरोपी सुमित शिरोदिया (अग्रवाल) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ याने संबंधित मुलाला ब्लॅकमेल करून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर घरुन पैसे आणण्यासाठी दबाव आणला. गेल्या आठ महिन्यात त्याने ब्लॅकमेलिंगद्वारे १५ ते २० लाख रुपये पीडित मुलाकडून उकळले. एवढेच नव्हे तर एक आलिशान कार खरेदी करून त्याचे मासिक हप्तेही भरायला लावले. चार दिवसांपूर्वी त्या मुलाच्या घरुन मोठी रक्कम चोरीस गेली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर कुटुंबीयांनी मुलाला विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेतली. या धक्कादायक प्रकाराबाबत कुटुंबीयांनी मुलाला सोबत घेऊन वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली. त्यानंतर शनिवारी उशिरा या प्रकरणात खंंडणी, जीवे मारण्याची धमकी आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. (स्थानिक प्रतिनिधी)