पुसद : आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत केलेल्या लज्जास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी येथील जय जवान माजी सैनिक असोसिएशनच्यावतीने येथील तहसील चौकात निषेध मोर्चा काढण्यात आला. भारत देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या व देशाच्या रक्षणासाठी विपरीत परिस्थितीत जीव हातावर घेऊन राहणाऱ्या सैनिकांच्या पत्नीबाबत आमदार परिचारक यांनी केलेल्या वक्तव्याचा या मोर्चातून निषेध करण्यात आला आहे. बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमदारांना पदावरून बरखास्त करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले, उपाध्यक्ष आलमगिर खान, भारत कांबळे, शेख चाँद, राजेंद्र पुरी, भारत गरड यांच्यासह अनेक माजी सैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुसद येथे माजी सैनिकांचा निषेध मोर्चा
By admin | Updated: March 4, 2017 01:01 IST