शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वत्र संततधार, कापूस, सोयाबीनला संजीवनी

By admin | Updated: September 1, 2014 00:16 IST

आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यावर एकदाच वरूणराजा प्रसन्न झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुसद तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. गत २४ तासात ६० मिमी पावसाची नोंद झाली.

पुसद : आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यावर एकदाच वरूणराजा प्रसन्न झाला. गेल्या तीन दिवसांपासून पुसद तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. गत २४ तासात ६० मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने कापूस, सोयाबीन पिकांना नवसंजीवनी मिळाली असून पूस धरणातही ४० टक्के जलसाठा झाला आहे. यंदा हवामानाचे सर्व अंदाज खोटे ठरवित पावसाने दोन महिने दडी मारली. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. शेतकऱ्यांची चिंता वाढली. मात्र गत दहा दिवसांपासून पावसाचे आगमन झाले. सर्वत्र पाऊस आल्याने नदी-नाल्यात पाणी वाहू लागले. विहिरी व हातपंपाच्या पाण्याची पातळी वाढली. पूस नदीवरील प्रकल्पात १५ आॅगस्टपर्यंत १८ टक्के जलसाठा होता. याची झळ पुसदकरांना बसणार होती. मात्र आता समाधानकारक पावसाने पूस धरणात तब्बल ४० टक्के पाणीसाठा झाला असल्याची माहिती उपविभागीय अभियंता मनोहर चव्हाण यांनी दिली. गेल्या २४ तासापासून सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळत आहे. २४ तासात तब्बल ६० मिमी पाऊस कोसळल्याची नोंद आहे. आतापर्यंत ३५१ मिमी पाऊस तालुक्यात कोसळल्याचे तहसील कार्यालयातील भाऊ चंद्रवंशी यांनी सांगितले. या पावसाने तालुक्यातील कापूस, ज्वारी, सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. शेतकरी लक्ष्मणराव जाधव म्हणाले, अलिकडचा पाऊस समाधानकारक असून पिकांना पोषक आहे. दुबार पेरणी केलेल्या पिकांनाही नवसंजीवनी मिळणार असल्याचे वरुड येथील शेतकरी संभाजीराव टेटर यांनी सांगितले. वृत्त लिहेस्तोवर पुसद तालुक्यात संततधार पाऊस सुरूच होता. या पावसामुळे कोरडे पडलेले नदी-नाले खळखळून वाहत आहेत. (प्रतिनिधी)