लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: शासन लक्ष देत नाही, राजकारणी फिरकत नाहीत आणि नागरिकांचे हाल संपत नाहीत. अशा स्थितीत गावागावातील युवक पुढे आले.. लोकवर्गणी गोळा झाली आणि पाहता पाहता आकाराला आला पांदण रस्ता.. यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगांव तालुक्यातील ही ताजी घटना. मौजा बोरजई ते बरडगाव पांदण रस्ता हा पूर्णत: खराब झाला होता. या रस्त्याबाबत वारंवार निवेदने देऊनही त्याकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने लक्ष दिले नाही. शेवटी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून, लोकसहभागातून पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.या रस्त्याचे उद्घाटन डाँ. रविंद्र कुमार कानडजे (तहसीलदार राळेगाव) यांचे हस्ते करण्यात आले. हे काम तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी विनोद अक्कलवार यांचे पुढाकारातून सुरू करण्यात आले आहे . यासाठी राळेगाव येथील शासकीय ठेकेदार राजेंद्र दुधपोळे यांनी कमी दरात जेसेबी मशीन देऊन शेतकऱ्यांना मदत केली. लोकवर्गणी जमा करण्याकरीता विजय सोनाळे, शेखलाल सोनाळे , संजय सोनाळे, गोविंद शिंदे, प्रविण नेहाने, संदिप उईके, शुभाष सोनाळे, व सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न केले आहे. लवकरच या पांदण रोडचे पालकमंत्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत खडीकरण करून द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
अखेरीस युवक पुढे सरसावले आणि तयार केला पांदण रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 17:29 IST
Yawatmal news शासन लक्ष देत नाही, राजकारणी फिरकत नाहीत आणि नागरिकांचे हाल संपत नाहीत. अशा स्थितीत गावागावातील युवक पुढे आले.. लोकवर्गणी गोळा झाली आणि पाहता पाहता आकाराला आला पांदण रस्ता..
अखेरीस युवक पुढे सरसावले आणि तयार केला पांदण रस्ता
ठळक मुद्देलोक वर्गणीतून बरडगाव ते बोरजई पांदण रस्त्याचे काम सुरू