शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षीवैभव संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:36 IST

तापमानाचा पारा वाढत असूनही जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात विविध रंगी पक्षांची घरटी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मात्र जलस्रोत आटत असल्याने ही घरटी आणि त्यातील अंडी उघडी पडली असून पक्षीवैभव संकटात सापडण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देधरणावर घरटी वाढली : जलस्रोत आटल्याने अंडी पडली उघडी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तापमानाचा पारा वाढत असूनही जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात विविध रंगी पक्षांची घरटी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. मात्र जलस्रोत आटत असल्याने ही घरटी आणि त्यातील अंडी उघडी पडली असून पक्षीवैभव संकटात सापडण्याचा धोका आहे.पांढरकवडाजवळील सायखेडा धरण, तेथून जवळच असलेल्या वाई, करणवाडी, जांब येथील तलावांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात पक्षांची घरटी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये चिमणासुरय (लिटील टर्न), पानभिंगरी, नदीसुरय, शेकाट्या या पक्षांच्या घरट्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मानद वन्यजीव रक्षक डॉ.रमजान विराणी यांच्या निरीक्षणादरम्यान या घरट्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. अशाच प्रकारच्या नोंदी यवतमाळजवळील निळोणा, बेंबळा धरणावरसुद्धा घेण्यात आल्या आहेत. बहुतांश घरटी धरणातील पाणी कमी झाल्यानंतर उघडी पडलेली आहेत. तलाव क्षेत्रातील जमिनीवर, गवतात किंवा वाळूच्या ठिकाणी यातील बहुतांश घरटी दिसतात. अशा पानथळ जागेवरील पक्षांची घरटी टिकविण्यासाठी व त्या क्षेत्रातील अन्न साखळी अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. या भागात जनावरे चारताना, तलावावरुन ओलित करताना किंवा मासेमारी करताना या घरट्यांना व त्यातील अंड्यांना इजा होण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे सायखेडा धरणात हे चित्र मोठ्या प्रमाणात असून तेथे काळजी घेण्याचे आवाहन डॉ. रमजान विराणी यांनी केले आहे.धरणातील मगरीचे आज ड्रोनद्वारे निरीक्षणपांढरकवडाजवळील सायखेडा धरणात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या जहाजाच्या आकाराची मगर आढळत आहे. मानद वन्यजीव रक्षक डॉ. विराणी यांनी माहिती पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक के.एम. अभर्णा यांना दिली. त्याची दखल घेत आता मंगळवारी ड्रोन कॅमेराद्वारे निरीक्षण करून या धरणात मगर असल्याची खात्री केली जाणार आहे. त्यानंतर पुढील पावले उचलली जाणार आहे.