शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही पाण्यासाठी वणवण भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 10:43 IST

Yawatmal News यवतमाळ तालुक्यात बोथबोडन हे गाव आहे. याच गावापासून  एक किलोमीटर अंतरावर गोकूळ हेटी आहे.  गोकूळ हेटी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पायपीट सुरू झाली आहे.

ठळक मुद्देगोकुळ हेटीवासी सोयी सुविधांपासून वंचित

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत. शहरी भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. ना रस्ता, ना घरकूल, पाण्यासाठी वणवण भटकंती, अशा भयावह अवस्थेत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही यवतमाळ जिल्ह्यातील गोकुळ हेटीवासीयांना जगावे लागत आहे.

 यवतमाळ तालुक्यात बोथबोडन हे गाव आहे. २००८  साली याच गावाला राहुल गांधी यांनी भेट दिली होती . यानंतर हे गाव संपूर्ण भारतात चर्चेत आले होते . याच गावापासून  एक किलोमीटर अंतरावर गोकूळ हेटी आहे.  गोकूळ हेटी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पायपीट सुरू झाली आहे. पाईपलाइन टाकून आहे. विहिरीला पाणी आहे. पण केवळ पाईपलाईन चोकअप असल्याने नागरिकांना पाण्यासाठी  वणवण भटकावे लागत आहे. महिलांच्या सोबत लहान मुलांना पाण्यासाठी जावे लागते. पाण्यासाठी पाच ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

येथे गवळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा दूधाचा व्यवसाय आहे . प्रत्येक व्यक्तिकडे 50 ते 100 जनावर आहे. दुभत्या जनावरांना कसे जगवावे असा प्रश्न त्यांना पडला आहे . गावातील बोअर कोरडे पडले आहेत आहे.1987 मध्ये या विहिरी वरुन बोथबोडन ,गोकूळ हेटी येथे या योजनेतुन पाणी पुरवठा होता. आता पाईपलाईन चोकअप झाल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

गावकऱ्यांनी सरपंच यांची भेट घेऊन व्यथा मांडली. मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप नागरीकांनी केला आहे. एकूणच विकासाचा गाजावाजा केला जात असला तरी गोकूळ हेटी येथील पाण्याची समस्या बघून सरकारचा दावा किती फोल आहे, हे दिसून येते.

टॅग्स :Waterपाणी