आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतजमीन नावे करून देण्यासाठी झालेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, तसेच जमिनीचे हक्क मिळावे, या मागणीसाठी डोंगरखर्डाच्या पाच शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात पाल टाकून उपोषण सुरू केले आहे. सात दिवस लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.तुकाराम जुनगरे, गणपत गराड, मारोती इंगळे, शंकर चामलाटे, महादेव बटाले यांनी उपोषण सुरू केले आहे. मोहदा येथील अकबर अली गिलाणी, बद्रुद्दिन अलीभाई गिलाणी यांनी पिंपळशेंडा (ता.कळंब) येथील शेतजमीन नावे करून देण्यासाठी रक्कम घेतली. जवळपास २० वर्षांचा कालावधी लोटूनही जमीन नावे करून देण्यात आली नाही, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले. वारंवार विनंती करूनही टाळाटाळ केली जात आहे. तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊनही गिलाणी यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. या अन्यायाविरूद्ध सदर पाच शेतकºयांनी पाल टाकून उपोषण सुरू केले आहे. सदर प्रश्न यापूर्वी पालकमंत्री, सहपालकमंत्री यांच्याकडेही मांडण्यात आला. त्यांनीही गांभीर्याने घेतले नाही.
डोंगरखर्डातील शेतकऱ्यांचे उपोषण बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:51 IST
शेतजमीन नावे करून देण्यासाठी झालेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, तसेच जमिनीचे हक्क मिळावे, या मागणीसाठी डोंगरखर्डाच्या पाच शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात पाल टाकून उपोषण सुरू केले आहे.
डोंगरखर्डातील शेतकऱ्यांचे उपोषण बेदखल
ठळक मुद्देप्रकृती खालावली : शेतजमीन नावे करून देण्यास टाळाटाळ, आर्थिक लूटही सुरू