शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दारव्हात रोटी बँकेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब शहरात अडकून पडले. त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. काहींनी तात्पुरती मदत केली. मात्र १५ दिवस काढायचे असल्याने चिंता वाढली.

ठळक मुद्देमहिलांचा पुढाकार : संचारबंदीत अडचणीतील कुटुंबांना मदत, पुरुषांचे सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : संचारबंदीमुळे कुणावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरात रोटी बँकेची स्थापना करण्यात आली. यासाठी महिलांनी पुढाकार घेतला.शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब शहरात अडकून पडले. त्यांच्या खाण्या-पिण्याचे वांदे झाले. काहींनी तात्पुरती मदत केली. मात्र १५ दिवस काढायचे असल्याने चिंता वाढली. व्यवसाय ठप्प असल्याने रोजमजुरी करणाऱ्यांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. ही अवस्था बघता येथील बंजारा कॉलनीतील नागरिक मदतीसाठी पुढे आले. अ‍ॅड. वैशाली हिरे यांनी ‘रोटी बँके’ची संकल्पना मांडली. त्याला महिला, पुरुषांनी होकार दिला.पोलीस कर्मचारी शुभांगी ऊंबरे यांच्यामार्फत ठाणेदार मनोज केदारे यांच्याकडून परवानगी घेतली. नंतर घरोघरी जाऊन अन्नदान करण्याचे आवाहन केले. १ एप्रिलपासून कॉलनीतील सर्व महिला अ‍ॅड. वैशाली हिरे यांच्या घरी तयार करण्यात आलेल्या रोटी बँकेत दोन वेळा अन्न पदार्थ गोळा करतात. नंतर ते अन्न गरजूंपर्यंत पोहोचविले जाते. यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. अन्न देताना खबरदारी घेतली जाते.या उपक्रमाकरिता अ‍ॅड. वैशाली हिरे, रंजना राठोड, कविता चावरे, कविता राठोड, नलिनी ठाकरे, रजनी खिराडे, मनू मापारे, छाया वानखडे, सुषमा मापारे, लता दुधे, प्रा. पद्मावती मेश्राम, बेबी राठोड, लता बुचके, शिला जाधव आदींनी पुढाकार घेतला. या उपक्रमाला विनोद राठोड, डॉ. रामधन हिरे, संजय ठाकरे, डॉ. चावरे, दीपक राठोड, किसन राठोड, संजय ठोकळे, भाऊ चव्हाण, सुदेश राठोड, भाऊ काळे, सुशील मापारे आदी सहकार्य करीत आहे.मदतीसाठी सरसावले अनेक हातमदतीकरिता अनेक जण पुढे येत आहे. किराणा साहित्य, बिस्कीट, पाणी, फळे आदींसह विविध वस्तुंचा पुरवठा करीत आहे. बंजारा कॉलनीत नागरिकांनी घरी स्वत: दोन वेळचे जेवण तयार करून ते सुरक्षितरित्या गरजूंंपर्यंत पोहोचविणे सुरू केले. गरिबांना मोठ्या अडचणीत दानशूर व्यक्तींमुळे दिलासा मिळाला. हा उपक्रम लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहील.