शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

२१९४ मॉ दुर्गांची स्थापना

By admin | Updated: October 2, 2016 00:17 IST

जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली.

उत्सव : १४ ठिकाणे संवेदनशील, २६४ शारदादेवी विराजमानयवतमाळ : जिल्ह्यातील दुर्गोत्सवाचा देशपातळीवर लौकिक आहे. मोठ्या उत्साहात जिल्हाभरातील दोन हजार १९४ मंडळांनी मॉ दुर्गेची स्थापना केली. तसेच २६४ शारदा मंडळांनीही मॉ शारदेची स्थापना केली. सर्वत्र उत्सवाचे वातावरण असून जिल्हा मुख्यालयी जय अंबेच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. यात पावसांच्या सरींनी वेगळीच रंगत भरली. मातेचे भक्त ढोलताशाच्या तालावर थिरकताना दिसत होते. पोलीस दप्तरी नोंद झालेल्या दोन हजार १९४ दुर्गा मंडळांनी पहिल्याच दिवशी मातेची स्थापना केली. यामध्ये शहरी भागातील ६२६ तर ग्रामीण भागातील एक हजार ५६८ दुर्गोत्सव मंडळ आहे. ४५८ गावांनी आदर्शाची परंपरा जोपासत ‘एक गाव एक दुर्गा’ या प्रमाणे स्थापना केली आहे. दुर्गोत्सवाप्रमाणेच शारदा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. २६४ मंडळांनी माँ शारदेची स्थापना केली आहे. यातील ४२ मंडळ शहरी भागातील असून ग्रामीण भागात २२२ मंडळे आहेत. एक गाव एक शारदा हा आदर्श १२२ मंडळांनी जोपासला आहे. भावपूर्ण वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणपती विसर्जनादरम्यान उमरखेड येथे झालेल्या घटनेनंतर संपूर्ण यंत्रणेलाच सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दुर्गोत्सवाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याची सतर्कता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) ही आहेत जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, घाटंजी, पुसद, उमरखेड, महागाव ही शहरी भागातील संवेदनशील ठिकाणे आहेत. ग्रामीण भागातील संवेदनशील ठिकाणामध्ये यवतमाळ तालुक्यातील रूईवाई, सावर, दिग्रसमधील कलगाव, महागाव येथील फुलसावंगी, खंडाळा येथील शेंबाळपिंपरी, पुसदमधील काळी दौ., जांबबाजार, वनवार्ला, धनसळ, बीटरगाव येथील ढाणकी, पोफाळी येथील मुळावा, उमरखेड येथील विडूळ, वडकी येथील खैरी, पारवा येथील कुर्ली, सदोबासावळी, वडगाव जंगल येथील अकोलाबाजार, येळाबारा, मेटीखेडा, शिरपूर येथील पुनवट, आर्णी येथील डेहणी, पाटण या ग्रामीण भागांचा संवेदनशील ठिकाणे म्हणून पोलिसात नोंद आहे. येथे विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुर्गोत्सवासाठी तीन हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त दुर्गोत्सवात शांतता कायम राखण्यासाठी जिल्ह्यात २१०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहे. ७०० होमगार्ड, एक एसआरपीएफची कंपनी, ६७ सहायक निरीक्षक व फौजदार, २९ पोलीस निरीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी आणि या सर्वांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे.