शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांवरून नगरपरिषदेत वातावरण तापले

By admin | Updated: December 14, 2015 02:30 IST

नगरपरिषदेच्या विषय समिती आणि सभापती निवडीवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असून यामुळे नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले आहे.

यवतमाळ नगरपरिषद : सर्वसाधारण सभेवर उमटणार पडसाद, स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला यवतमाळ : नगरपरिषदेच्या विषय समिती आणि सभापती निवडीवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असून यामुळे नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले आहे. १५ डिसेंबर रोजी होत असलेल्या सर्वसाधारण सभेवरही याचे सावट आहे. विशेष म्हणजे भाजपाचे संख्याबळ अधिक असतानाही महत्वाची पदे मात्र राष्ट्रवादीकडे आहे. आतापर्यंतच्या निवड प्रक्रियेत राष्ट्रवादीच वरचढ ठरली. त्यामुळे स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात कधी नव्हे इतकी अस्थिर परिस्थती मागील चार वर्षात निर्माण झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीपासूनच सर्वच पक्षाच्या नगरसेवकांत गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे येथे पक्षनिष्ठा कोणातच दिसून येत नाही. आपल्या हितसंबधासाठी कुणाशीही जुळवून घेण्याचा प्रघात येथे पडला आहे. त्यामुळे सत्ते बसूनही सातत्याने नगराध्यक्षाभोवती अस्थिरतेचे वातावरण राहिले आहे. १७ डिसेंबरला होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडप्रक्रियेत अनेक राजकीय समीकरणे दडले आहेत. नगपरिषदेत भाजपाचे १६ सदस्य आहेत. काँग्रेसचे ११, राष्ट्रवादी सहा, बसपा चार, अपक्ष तीन , शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. मात्र हे संख्याबळ कोणत्याच पक्षाला टिकवता आले नाही. भाजपासह सर्वच पक्षामध्ये दोन गट आहेत. यातील बहुतांश सदस्यांवर अपात्रतेच्या याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. आपसातील संबध टोकाला गेलेले असताना ही निवडणूक होत आहे. त्यामुळे स्थानिक आमदार मदन येरावर यांना पक्षाच्या नगरसेवकांना एकत्र आणण्याची कसरत करावी लागणार आहे. अन्यथा विषय समितीसाठी वेळेवर बंड पुकारण्याची तयारीही दुसऱ्या गटाकडून सुरू आहे. भाजपा, राष्ट्रवादी, बसपा आणि शिवसेना नगरसेवकांनी मिळून तयार केलेली शहर विकास आघाडी खिळखिळी झाली आहे. यातून एक मोठा गट माजी नगराध्यक्ष योगेश गढिया यांच्याकडे आहे. त्यासोबतच विरोधी काँग्रेस नगरसेवकांतही फूट पडली आहे. नगरपरिषदेतील दुसरे मात्तबर बाळासाहेब चौधरी यांनी आपल्या समर्थकांचा वेगळा गट केला आहे. या प्रक्रियेत आपल्या समर्थक सदस्यांसाठी पद मिळविण्याकरिता त्यांच्याकडूनही प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष सुभाष राय यांनासुध्दा आपल्या पाठीराख्यासाठी समिती निवडावीच लागणार आहे. अपक्ष नगरसेवकांची संख्या केवळ तीन असली तरी त्यांचे नेते अफसर शाहा यांचीही भूमिका निणार्यक ठरणारी आहे. अशा स्थितीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपातून नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड महत्वाकांक्षा घेऊन असलेले प्रवीण प्रजापती यांच्याकडूनही समिती निवडण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विधान परिषद निवडणूक जवळ असल्याने वरिष्ठ सभागृहातील आमदारही परिस्थिती कशी अनुकूल करता येईल याचा डाव मांडण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहेत. एकंदर सर्वच घटक विषय समितीसाठी प्रत्यक्ष सक्रिय दिसत नसले तरी गुप्त हालचालींना वेग आला आहे. नगरपरिषदेतील कोणतीच प्रक्रिया ही घोडेबाजार केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे याही निवडणुकीत इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्यास घोडेबाजार होणार हे निश्चित मानले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)