शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

जिल्हा संपर्क प्रमुखांच्या कार्यशैलीने शिवसैनिकांत उत्साह

By admin | Updated: April 8, 2015 02:11 IST

शिवसेनेचे उपनेते तथा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांच्या सामान्य कार्यशैलीने जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

यवतमाळ : शिवसेनेचे उपनेते तथा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांच्या सामान्य कार्यशैलीने जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख पद यापूर्वी मुंबई बाहेरील नेत्याकडे होते. या नेत्याच्या ताठर भूमिकेमुळे शिवसैनिक दुखावले जात होते. जिल्हास्तरावरील प्रमुख दोन-चार पदाधिकाऱ्यांच्या गोतावळ्यात राहण्याच्या सवईमुळे सामान्य शिवसैनिकांना या नेत्यापासून चार हात दूरच रहावे लागत होते. पाया पडणाऱ्या शिवसैनिकांना या नेत्याचा शाब्दीक मार सहन करावा लागत होता. सामान्य शिवसैनिकाला स्थानिक नेत्यांना टाळून थेट संपर्क प्रमुखाकडे आपले गाऱ्हाणे मांडण्याची मूभा नव्हती. कारण हे नेते चौकडीच्या बाहेर निघतच नव्हते. सामान्य शिवसैनिकांत ते कधी मिसळल्याचे तर कुणाच्याही स्मरणात नाही. शिवसेनेचे जिल्ह्याचे नवे संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांनी मात्र या परंपरेला फाटा दिला आहे. रविवारी जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा येथे घेण्यात आला. नेरूरकर या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण होते. विशेष असे त्यांनी आपल्या कार्यशैलीने शिवसैनिकांना आकर्षितही करून घेतले. प्रमुख नेत्यांना बाजूला सारत ते सामान्य शिवसैनिकांमध्ये मिसळले. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांच्यासोबत बसून चहा घेतला. वरिष्ठ नेत्याच्या वागणुकीचा हा आगळावेगळा अनुभव शिवसैनिकांनी घेतला. मी कुणाला पदावरून काढायसाठी आलो नाही, पक्षाचा कार्यक्रम घेऊन आलो आहे. मात्र जो पक्षाला साथ देणार नाही, पक्ष वाढविणार नाही, त्याला निश्चित बाद केले जाईल, असा संदेश नेरूरकर यांनी शिवसैनिकांना दिला. त्यांची ही स्टाईल सामान्य कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक वाटली, तशा प्रतिक्रियाही शिवसैनिकांमधून ऐकायला मिळाल्या. त्यामुळे शिवसैनिकातील उत्साह वाढल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर काम करताना नेत्यांची अशी सामान्य वागणूक फारच कमी अनुभवायला मिळत असल्याचा सूरही मेळाव्यात ऐकायला मिळाला. (जिल्हा प्रतिनिधी)