शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता तरुणाने नफ्यात आणली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:18 IST

शेतीत काही उरत नाही, असे म्हणत शेतकऱ्यांची मुले शेतीकडे पाठ फिरवित आहे. अशा काळात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाने मात्र शेतीतून ३ हजार रुपये रोज कमाई करण्याचा मार्ग शोधला आहे.

ठळक मुद्देश्रेणिकची यशस्वी फुलशेती : रोजी तीन हजार रुपयांचे उत्पन्न, नागपूर-पुण्यातून मागणी

किशोर वंजारी।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेतीत काही उरत नाही, असे म्हणत शेतकऱ्यांची मुले शेतीकडे पाठ फिरवित आहे. अशा काळात एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाने मात्र शेतीतून ३ हजार रुपये रोज कमाई करण्याचा मार्ग शोधला आहे. जिल्ह्यातील शेतकरी सहसा निवडत नाही, असा फुलशेतीचा मार्ग त्याने चोखाळला. श्रेणिक रमेशचंद्र सिंगवी या तरुणाची शेती पाहण्यासाठी आता मोझर गावात शेतकऱ्यांची रिघ लागत आहे.तालुक्यातील मोझर येथील सुरजमलजी सिंगवी हे स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या मित्र परिवारातील एक होते. त्यांचा नातू श्रेणिक रमेशचंद्र सिंगवी (२३) हा संत गाडगेबाबा विद्यापीठातून २०१६ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला. पण शेतीत क्रांती आणण्याची त्याची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. यातच त्याने शेतात पोल्ट हाउसची उभारणी केली. यात त्याने अरबेला या फुलांची लागवड केली. आज या फुलशेतीला बहर आला आहे. अरबेरा आठ विविध रंगात बहरते. नागपूर, पुणे, कारंजा, हैदराबाद येथील फुल व्यापारी या अत्यंत देखण्या फुलांची थेट मागणी करीत आहेत. आकर्षक पॅकिंगमध्ये ही फुले तेथील बाजारपेठेत जातात. त्यातून रोज चार ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न होत आहे. आगामी काळात हे उत्पन्न पाच ते सहा हजार होण्याची शक्यता आहे.आता फळबागेचा मानससॉफ्टवेअर अभियंता असताना विविध प्रकारची फुले श्रेणिक फुलवित आहे. आता फळबाग फुलविण्याचा त्याचा मानस आहे. पिता रमेशचंद्र आणि आई किरण आपल्या लेकाच्या मेहनतीला पाठबळ देत असतात. श्रेणिकची फुलशेती इतर युवा शेतकºयांना नवा आॅक्सिजन देणारी ठरत आहे.